Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 31 March
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
: ३१
मार्च २०२३ सकाळी ७.१०
मि.
****
ठळक
बातम्या
·
छत्रपती
संभाजीनगर शहरात सर्वांनी शांतता बाळगण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन,
·
किराडपुऱ्यातील
घटनेत २० वाहनं जळून खाक, ४०० ते ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल,
तपासासाठी आठ पथकं नियुक्त
·
केंद्र
शासनाच्या पीएमश्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातल्या ५१६ शाळांना मान्यता
·
राज्यात
थायरॉईड जनजागृती आणि उपचार अभियान राबवण्यास प्रारंभ
·
पंजाब
नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी बीड जिल्ह्याच्या शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी आणि सीबीआयचे
छापे
·
नांदेड
जिल्ह्यात ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात सात महिन्यांच्या बालिकेसह पाच जणांचा मृत्यू
आणि
·
सोळाव्या
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं आज उद्घाटन
सविस्तर
बातम्या
छत्रपती
संभाजीनगरसह राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावी यासाठी सर्वांनी शांतता बाळगण्याचं
आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते म्हणाले,
Byte…
आता सध्या पोलिसांच्या पूर्ण
कंट्रोलमध्ये तिथला सर्व परिसर आहे. आणि सर्वांनीच त्याठिकाणी शांतता राखली पाहिजे.
रामनवमीचा उत्सव आहे. आणि आपल्या राज्यामध्ये सर्वधर्मीय सर्व सण एकत्र येऊन साजरे
करतात. त्यामुळे सर्व धमिर्यांना माझं आवाहन आहे, विनंती आहे की आपण सर्वांनीच शांततेत
या सर्व उत्सवांना सहकार्य केलं पाहिजे.
छत्रपती
संभाजीनगर शहरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काल किराडपुरा भागामध्ये शांततेचा
संदेश देत ऐक्य पदयात्रा काढली.
दरम्यान, बुधवारी रात्री झालेल्या या घटनेत दुचाकी
आणि चारचाकी अशी २० वाहनं जळून खाक झाली आहेत. यात पोलिसांच्या १२ वाहनांचा समावेश
आहे. जमावाकडून झालेल्या हल्ल्याला प्रत्यूत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला, यात
एकाचा मृत्यू झाला. जमावानं पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत २० पोलिस कर्मचारी जखमी झाले.
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल ४०० ते ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,
तपासासाठी आठ पथकंही नियुक्त करण्यात आली आहेत.
तणावग्रस्त
भागात पोलीस आणि राज्य राखीव पोलिस दलाचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातल्या
संवेदनशील भागातही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात
असल्याचं, आणि रात्री कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याचं, पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर
यांनी आज सकाळी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
****
दरम्यान,
किराडपूरा भागातल्या श्रीराम मंदिरात केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री
संदिपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास
दानवे यांनी श्रीरामचं दर्शन घेतलं. या परिसरात झालेल्या वादातून करण्यात आलेल्या जाळपोळीची
या नेत्यांनी पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. पालकमंत्री भुमरे यांनी यावेळी बोलताना,
परिस्थिती नियंत्रणात असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं.
काही
नेते या घटनेला राजकीय वळण देत आहेत. हे चुकीचं असून सर्वांनी शांतता राखण्याचं आवाहन
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते म्हणाले,
Byte…
या
क्षणी तिथे शांतता आहे. तरी देखिल ही शांतता राहिली पाहिजे असा प्रयत्न सगळ्यांनाच
करावा लागेल. म्हणूनच मी म्हटलं की काही नेते जाणीवपूर्वक राजकीय स्टेटमेंट देवून तिथली
परिस्थिती बिघडली पाहिजे असा प्रयत्न करताहेत. स्वत:च्या स्वार्थाकरता हा प्रयत्न त्यांचा
चाललेला आहे. तो त्यांनी तात्काळ बंद करावा. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे शांतपणे
आपला सगळा कार्यक्रम पार पाडावा कुठेही गडबड गोंधळ होवू नये, कुणीही एकमेकांच्या समोर
येवू नये, कुठेही शांततेचा भंग होणार नाही याकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं.
****
दरम्यान,
छत्रपती संभाजीनगरमधल्या तणावाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी तेढ निर्माण
करण्याचा प्रयत्न करु नये, असं आवाहन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी केलं आहे. ते काल पुण्यामध्ये बोलत होते. संपूर्ण राज्यात तणाव निर्माण
करण्याचा कट काही लोकांचा आहे, पोलिस प्रशासनानं यासंदर्भात अधिक लक्ष घालून दोन धर्मात
कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन पाटील यांनी केलं.
दरम्यान,
शहरात काल शांतता समितीची बैठक पार पडली. नागरीकांनी शांतता आणि सौहार्द राखण्याचं
आवाहन सर्वपक्षीय प्रतिनिधींनी यावेळी केलं.
****
राज्य
सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी
सरकारनं तत्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
भारतीय जनता पक्ष प्रणित शिंदे सरकारच्या नऊ महिन्यांतल्या कारभारानं, राज्याच्या प्रतिमेला
मोठा धक्का बसला आहे. काही संघटनांमुळे धार्मिक वाद वाढत असून, सरकार त्यांच्यावर काहीच
कारवाई करत नाही. सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारवर नपुंसक असल्याचे ताशेरे ओढले
आहेत, सरकार काहीच करत नाही म्हणून धार्मिक वाद विकोपाला जात आहेत, असा संताप न्यायालयानं
व्यक्त केल्याचं, पटोले यांनी सांगितलं. सत्ताधारी पक्षातले आमदार- खासदार गुंडगिरी
करतात, गृहमंत्र्याच्या घरात कुख्यात माफीयाचा हस्तक राजरोस वावरतो, तरी पोलीस यंत्रणा,
गृहमंत्र्यांना त्याची खबर लागत नाही, अशी टीका पटोले यांनी केली. माजी मंत्री, आमदार
यांच्यावर हल्ले होतात, त्याची दखल घेतली जात नाही. सत्ताधारी पक्षाचा आमदार गोळीबार
करतो, त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते, असा आरोपही पटोले यांनी केले.
****
सर्वोच्च
न्यायालयानं राज्य सरकारला नपुंसक सरकार म्हटलेलं आहे, हा सरकारचा कमीपणा नाही का,
असा प्रश्न विधानसभेतले विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. काल नाशिकमध्ये
पत्रकारांशी बोलतांना त्यांनी हा राज्याचा अपमान नाही का, अशी विचारणाही केली. ते म्हणाले,
Byte…
काल सुप्रीम कोर्टानं या
सरकारला नपुंसक सरकार म्हटलेलं आहे. हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? हा सरकारचा कमीपणा
नाही का? आम्ही अधिवेशनाच्या निमित्तानं जवळपास चार आठवडे अठरा दिवस, म्हणजे वर्किंग
डे अठरा दिवस होते, आम्ही तेच सांगत होतो. की हे सरकार जे काही काम करतंय त्यांना वाईट
वाटतं त्यांना राग येतो.
****
सर्वोच्च
न्यायालयानं राज्य सरकारविरुद्ध निर्णय दिलेला नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले,
Byte…
सॉलिसिटर जनरल साहेबांनीही
इतर राज्यांमध्येही काय काय होतंय आणि कसं महाराष्ट्रालाच पिन पॉईंट करण्याचा प्रयत्न
होतोय हे लक्षात आणून दिल्यानंतर एक जनरल स्टेटमेंट त्यांनी सगळ्यांबद्दल केलेलं आहे
की राज्य सरकारांनी कारवाई केली पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतंय की कुठेही राज्य सरकारच्या
विरूद्ध निर्णय दिलेला नाही. कुठेही कंटेम्पट सुरू केलेला नाही. जाणीवपूर्वक कुठलंही
वाक्य एखादं काढायचं आणि त्या सदंर्भात बोलायचं, मला वाटतं हे जे बोलतायत त्यांना न्यायालयाची
कारवाई समजत नाही. न्यायालय काय म्हणतंय हे देखील समजत नाही आणि त्यामुळे हे लोकं असं
बोलतायत.
****
केंद्र
शासनाच्या पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया - पीएमश्री योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात
राज्यातल्या ५१६ शाळांना मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी
ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शाळांचा विकास केला जाईल, असं
त्यांनी सांगितलं. या ५१६ शाळांमध्ये ४२६ प्राथमिक आणि ९० माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शाळांचा समावेश आहे. यात छत्रपती संभाजीनगर मधल्या ११, बीड १३, हिंगोली पाच, लातूर
१३, नांदेड १८, परभणी ११, धाराशिव नऊ आणि जालना जिल्ह्यातल्या १२ शाळांचा समावेश आहे.
****
महामार्गांवर
आता उपग्रह आधारित पथकर वसूल करण्याची प्रणाली सुरु करण्यात येणार असल्याचं, केंद्रीय
रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. या प्रणालीमुळे पथकर
वसुली आणि वाहतुकीतले अडथळे दूर होण्यास मदत होईल, असं ते म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गाच्या
कामाचा काल त्यांच्या हस्ते पनवेल तालुक्यात खारपाडा इथं शुभारंभ झाला, त्यावेळी ते
बोलत होते. यावर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, यामुळे कोकण विभागाच्या विकासाला
मोठी चालना मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.
****
राज्यातल्या
दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक देत असल्याची माहिती, महिला
आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल मुंबईमध्ये दिली. त्यांच्या उपस्थितीमध्ये
मंत्रालयात या संदर्भातला सामंजस्य करार झाला. अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर
२०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत.
त्यामुळं राज्यात एकूण ४४१८ अंगणवाड्यांचा विकास होण्यास सामाजिक संस्थाचं सहकार्य
मिळत असल्याचं लोढा यावेळी म्हणाले.
****
राज्यात
कालपासून वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्यं विभाग यांच्यामार्फत थायरॉईड जनजागृती आणि
उपचार अभियान राबवण्यात येत आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या
थायरॉईड बाह्यरुग्ण विभागाचं, काल वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते
उद्घाटन झालं. या रोगासंदर्भात जनजागृती करणं आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये
थायरॉईड उपचारांसाठी विविध सोयी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या अंतर्गत शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयांमध्ये दर गुरुवारी दुपारी बारा वाजता, औषध वैद्यकशास्त्र विभागाअंतर्गत
विशेष थायरॉईड उपचार सेवा चालवली जाणार आहे. नांदेडमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात सामाजिक कार्यकर्ते गोवर्धन बियाणी यांच्या हस्ते या अभियानाची
सुरुवात करण्यात आली.
****
पंजाब
नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यातल्या मुंगी इथल्या शिवपार्वती
साखर कारखान्यावर सक्तवसुली संचालनालय - ईडी आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग -सीबीआयनं
काल छापे टाकले. हा कारखाना २०१३ पासून निर्माणाधिन अवस्थेत आहे. पुरेसं तारण नसतानाही
पंजाब नॅशनल बँकेनं या कारखान्याला कोट्यवधी रुपयांचं कर्ज दिलं आहे. कारखान्याच्या
तत्कालिन अध्यक्षानं भागिदारीसाठी करारनामा केलेल्या बाँडच्या सहाय्यानं हे कर्ज उचलल्याची
माहिती आहे. बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर या
कारखान्याने दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च केले, आणि त्यानंतर काही कालावधीनं हा कारखाना
दिवाळखोरीत काढण्यात आला. त्यामुळे बँकांनी कर्जवसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता लिलावात
काढली आहे. यासंबंधीचं प्रकरण न्यायालयात सुरु असताना आता तपास यंत्रणांकडून कारखान्यावर
हे छापे मारण्यात आले आहेत.
****
नांदेड
जिल्ह्यात मुदखेड - नांदेड रस्त्यावर ट्रक आणि रिक्षाच्या अपघातात काल एका सात महिन्यांच्या
बालिकेसह पाच जणांचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले. मुदखेड शहरातून निघालेल्या
अपघातग्रस्त रिक्षातून दहा मजूर कामासाठी नांदेडला येत होते. मुगट शिवाराजवळ समोरुन
आलेल्या ट्रकनं रिक्षाला धडक दिल्यानं हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींना
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या भिषण अपघातामुळे मुदखेड - नांदेड
मार्गांवरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या किनवटमध्ये काल आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीत आनंदाचा शिधा वितरणाला
प्रारंभ झाला. जिल्ह्यातल्या पात्र शिधा पत्रिकाधारकांसाठी एकूण पाच लाख ९३ हजार शिधा
वस्तु संच मंजूर करण्यात आले आहेत.
****
महिला
उत्पादक बचत गटांनी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचा दर्जा राखण्यासाठी प्रयत्न करावेत,
असं आवाहन धाराशीव जिल्हा ग्रामविकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे यांनी
केलं आहे. ‘तेजस्विनी महोत्सव २०२३’
च्या समारोप प्रसंगी काल त्या बोलत होत्या.
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या विक्रीसाठी बदलत्या समाज माध्यमांचा
उपयोग करुन घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या तीन दिवसीय प्रदर्शनात सहभागी
झालेल्या महिलांनी आपले अनुभव यावेळी कथन केले.
****
पत्रकार
शिवीगाळ, धक्काबुक्की प्रकरणात अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा
दिला आहे. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यावर न्यायालयानं काल संपूर्ण प्रकरण रद्द
केलं. अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी बजावलेलं समन्सही उच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. २०१९
मध्ये सलमान खान अंधेरी परिसरात सायकल चालवत असताना एक पत्रकार अशोक पांडे यांनी त्याचं
चित्रीकरण केलं. हे चित्रीकरण त्यानं ‘यू ट्यूब’वर
टाकण्यासाठी केलं होतं, ही बाब सलमान आणि त्याच्या सुरक्षा रक्षकाला आवडली नाही. त्यामुळे
सलमान आणि त्याच्या सुरक्षा रक्षकानं त्याला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली, अशी तक्रार
या पत्रकारानं पोलिसांकडे केली होती.
****
सोळाव्या
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं आज उद्घाटन होणार आहे. वर्ष २०१८ नंतर
प्रथमच ही स्पर्धा घरच्या आणि बाहेरच्या मैदानांवर होणार आहे. अहमदाबादमधल्या नरेंद्र
मोदी क्रीडा संकुलामध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज दरम्यान आज संध्याकाळी
साडे सात वाजता पहिला सामना होणार आहे.
****
राज्यात
काल सर्वत्र श्रीरामनवमी भक्तीभावात साजरी झाली.
छत्रपती
संभाजीनगर शहरातल्या किराडपुरा इथल्या राममंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला.
जालना
शहरासह जिल्ह्यात रामनवमी विविध उपक्रमांनी झाली. नवीन जालन्यातल्या श्रीराम मंदिरातून
श्रीरामाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.
शिर्डीत
साईबाबा मंदिर संस्थानातर्फे श्री रामनवमी उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात
आला. श्री साईरचित ग्रंथाचं अखंड पारायण समाप्तीनंतर ग्रंथाची सवाद्य मिरवणूक काढली.
रामनवमीच्या निमित्तानं साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी ठिकठिकाणांहून पालख्या आल्या
होत्या.
बुलढाणा
जिल्ह्यातल्या शेगाव इथं गजानन महाराज संस्थान परिसरांत पाच दिवसांपासून सुरु असलेल्या
श्रीराम नवमी महोत्सवाची काल सांगता झाली.
नाशिक
इथं पंचवटी परिसरातल्या श्री काळाराम मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. धुळे,
वाशिम, सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर इथंही रामनवमी भक्तीभावाने उत्साहात साजरी करण्यात
आली.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वार्षिक स्नेहसंमेलन ज्ञानतीर्थ २०२३ या
कार्यक्रमाचं आज आणि उद्या आयोजन करण्यात आलं आहे. सिने अभिनेते नरेंद्र देशमुख यांच्या
हस्ते या कार्यक्रमाचं उद्धाटन होणार आहे.
****
No comments:
Post a Comment