आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०५ एप्रिल २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
स्टँड अप इंडिया योजनेचा सहावा वर्धापन दिन आज साजरा
होत आहे. याअंतर्गत आतापर्यंत देशभरातल्या एक लाख ८० हजार ६३६ खात्यांना ४० हजार ७१० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महिला, अनुसूचित
जाती आणि अनुसूचित जमाती श्रेणींमध्ये उद्योजकतेला चालना देणं, हा या योजनेचा
उद्देश आहे.
***
केंद्र सरकारने स्वदेशी ड्रोनचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या विशेष
मदत निधी योजनेअंतर्गत, २०२२-२३ या वर्षासाठी ३० कोटी रुपयांची मदत लाभार्थींना वितरीत करण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं ही माहिती दिली.
***
सिक्कीम
मध्ये गंगटोक जिल्ह्यातल्या गंगटोक - नथूला जवाहरलाल नेहरू मार्गावर काल संध्याकाळी
दुसऱ्यांदा भूस्खलन झालं. त्यामुळे आधी झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेतलं
बचाव कार्य थांबवण्यात आल होतं, मात्र आज हे बचाव
कार्य पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. या हिमस्खलनात सात पर्यटकांचा मृत्यू झाला, तर २३ जणांना वाचवण्यात
बचाव पथकाला यश आलं आहे.
***
२०२३-२४ या आर्थिक वर्षात देशातला महागाई दर पाच पूर्णांक
दोन दशांश टक्के राहील, असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे.
मागच्या आर्थिक वर्षात हा दर सहा पूर्णांक सहा दशांश टक्के इतका होता.
चालू आर्थिक वर्षात भारताचा सकल घरगुती उत्पादन दर तीन टक्के राहण्याचा
अंदाजही बँकेनं वर्तवला आहे.
***
देशात कंपन्यांकडून मिळणाऱ्या करात सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२२-२३ या आर्थिक वर्षात कॉर्पोरेट कर संग्रहात सतरा टक्क्यांची वाढ झाल्याचं अर्थ
मंत्रालयानं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे.
***
राज्यात कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, संशयित रुग्णांनी आणि लक्षणे आढळणाऱ्यांनी मास्क वापरण्याचं आवाहन आरोग्य
मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. ते काल मुंबईत
बोलत होते. राज्यात सध्या मास्क वापरणं बंधनकारक नसल्याचं त्यांनी
सांगितलं.
***
राज्यातल्या सहा हजार दोनशे रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गेल्या
नऊ महिन्यांमध्ये पन्नास कोटी पंचावन्न लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी ही माहिती
दिली.
//*************//
No comments:
Post a Comment