आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२५
जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
अठराव्या
लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात नवनिर्वाचित संभासदांचा शपथविधी आजही सुरू राहणार आहे.
लोकसभा अध्यक्षांची निवड उद्या होणार आहे.
****
भाजपचे
अध्यक्ष केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची राज्यसभेतले विरोधी
पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली. नड्डा यांचा पक्षाध्यक्षपदाचा कालावधी लवकरच संपणार
आहे.
****
देशात
आणीबाणी लागू केल्याच्या घटनेला आज ४९ वर्ष पूर्ण झाली. पुन्हा कधीही आणीबाणीसारखी
परिस्थिती येणार नाही, अशा
मजबूत लोकशाहीचा आणि संविधान रक्षणाचा संकल्प करु या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात केलं आहे.
****
वैद्यकीय
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट युजी परिक्षेतल्या कथित गैरप्रकारांचे धागेदोरे
बिहार, गुजरात आणि राजस्थानमध्येही
आढळून आले आहेत. या तिनही राज्यातल्या गैरप्रकारांची चौकशी आता केंद्रीय अन्वेषण विभाग
- सीबीआय करत आहे. गुजरात आणि बिहारमधून प्रत्येकी एक आणि राजस्थानमधून तीन प्रकरणं
उघडकीला आली आहेत.
****
केंद्रीय
आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल अतिसार निर्मूलन मोहिमेची सुरुवात केली. अतिसारामुळे
होणारे बालमृत्यू थांबवणं हा या मोहिमेचा हेतू आहे. दोन महिने चालणाऱ्या या मोहिमेत
पाच वर्षांखालच्या बालकांना ओआरएस आणि झिंकची पाकिटं देण्यात येणार आहेत.
****
केरळ
राज्याचं नाव केरळम् असं करण्याचा प्रस्ताव केरळच्या विधानसभेत काल एकमताने संमत झाला.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना मांडलेला हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात
येईल.
****
भंडारा
जिल्ह्यातल्या गोसीखुर्द जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काल मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. १०२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्रात
पर्यटनाला मोठा वाव आहे, असं
सांगत, गोसीखुर्द हे जागतिक दर्जाचं
पर्यटन स्थळ असल्यानं इथे देश-विदेशातील पर्यटक देखील भेट देतील, असं ते म्हणले.
****
No comments:
Post a Comment