Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 June
2024
Time: 7.10
AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· सुधारीत फौजदारी कायद्यांमध्ये
दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य-राष्ट्रपतींचं प्रतिपादन
· राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला
प्रारंभ-चालू आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सादर होणार
· स्मार्ट मीटर फक्त सरकारी
कार्यालयात बसवण्यात येणार असल्याचं महावितरणकडून स्पष्ट
· नांदेडहून पुणे तसंच नागपूरसाठी
विमानसेवेला कालपासून सुरूवात
आणि
· इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव
करत भारताची टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
सविस्तर बातम्या
देशात
एक जुलैपासून लागू होणाऱ्या सुधारीत फौजदारी कायद्यांमध्ये दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य
दिलं जाणार आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे.
संसदेच्या अधिवेशनात काल दोन्ही सभागृहांसमोर राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
Byte…
आपल्या
अभिषणात राष्ट्रपतींनी नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक, भारतीय अर्थव्यवस्थेची झेप, महिला सक्षमीकरण यावर प्रकाश
टाकला. सरकारचा आगामी अर्थसंकल्प भविष्यकालीन नियोजन आणि जलद सुधारणा यावर भर देणारा
असेल, असा
विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पेपर
फुटीप्रकरणी सरकार ठोस उपाययोजना करत आहे, या प्रकरणाची नि:पक्ष चौकशी केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर
लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यसभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
सभागृहाला नवीन मंत्र्यांची ओळख करून दिल्यानंतर, कामकाज स्थगित झालं.
****
विधिमंडळाच्या
पावसाळी अधिवेशनाला कालपासून प्रारंभ झाला. राज्याचा वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प आज
सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर
करतील. काल अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी अर्थमंत्र्यांनी २०२३-२४ या वर्षाचा आर्थिक
पाहणी अहवाल दोन्ही सभागृहांच्या पटलावर मांडला.
राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ सात पूर्णांक सहा दशांश टक्के असेल, असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात
आला आहे. २०२२- २३ या आर्थिक वर्षात राज्याच्या स्थूल उत्पादनात नऊ पूर्णांक ४ दशांश
टक्क्यांची वाढ झाली होती. सेवा क्षेत्रात सर्वाधिक आठ पूर्णांक आठ दशांश टक्के, तर कृषी क्षेत्रात सर्वात
कमी एक पूर्णांक नऊ दशांश टक्के वाढ झाली. उद्योग क्षेत्राचा वाढीचा दर सात पूर्णांक
सहा दशांश टक्के राहील, असा अंदाज यात वर्तवला आहे.
दरडोई
उत्पन्नात महाराष्ट्र देशात सहाव्या स्थानी आहे. परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात
गेल्या आर्थिक वर्षातही महाराष्ट्र पहिल्या स्थानी राहिला आहे.
****
प्रादेशिक
नियोजन आणि नगर रचना तसंच राज्य कौशल्य विद्यापीठासंबंधीचे अध्यादेश काल विधान परिषदेच्या
पटलावर मांडण्यात आले. तसंच दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या सात विधेयकांना राज्यपालांची
संमती मिळाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रसाद लाड, विलास पोतनीस, अमोल मिटकरी, अभिजीत वंजारी आणि मनीषा
कायंदे या सदस्यांची सभापती तालिकेवर नियुक्ती केली.
राज्यभरात
सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांना योग्य सोयीसुविधा मिळत
नसल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल विधान परिषदेत उपस्थित केला.
त्यावर, यासंदर्भात
सर्व संबंधित यंत्रणांना सूचना दिल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिली.
****
राज्यात
महायुती मजबूत असून, दोन वर्षात राज्यसरकारने चांगले निर्णय घेतले असल्याचं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं केलं. ते काल विधीमंडळ परिसरात वार्ताहरांशी
बोलत होते. ड्रग्ज प्रकरणात संपूर्ण राज्यात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, शाळा-महाविद्यालयाच्या परिसरातल्या
टपऱ्या हटवण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
विधानसभा
निवडणुकीआधी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात
सुरू असलेल्या ओबीसी आणि मराठा आंदोलनाच्या प्रश्नांवर सर्वमान्य तोडगा निघणार असेल
तर आपण सरकारसोबत असू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शेतकरी आत्महत्या, पोलिस भरती, अंमली पदार्थ तस्करीचं वाढतं
प्रमाण या विषयांवरही ठाकरे यांनी सरकारचं लक्ष वेधलं.
****
शेतकऱ्यांना
कर्जमाफी, विजबिल
माफी, नैसर्गिक
आपत्तींची नुकसान भरपाई द्यावी आदी मुद्द्यांवर काल विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर
आंदोलन केलं. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीही देणंघेणं नाही, असा आरोप विधान परिषदेचे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केला.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी परवा रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि
दुरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन
देत आहोत
****
वैद्यकीय
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेतल्या कथित अनियमिततेप्रकरणी केंद्रीय
अन्वेषण विभाग - सीबीआयनं काल दोघांना बिहारमध्ये
पाटणा इथून अटक केली. राज्यात नीट परीक्षेतल्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
वर्ग करण्यात आला आहे. लातूर पोलिसांनी याप्रकरणी दोन शिक्षकांना अटक केली आहे.
****
महसूल
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या
विविध विषयांवरील आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातल्या विविध प्रश्नांवर सखोल
चर्चा करून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात आले. सिल्लोड तालुका दूध संघाने महानंदसोबत
सदस्यत्व देण्याचा, तसंच सोयगाव पशुसंवर्धन
विभागातली रिक्त पदे भरण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पणन आणि अल्पसंख्याक विकास
विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यावेळी उपस्थित होते.
****
स्मार्ट
मीटर सर्वसामान्य ग्राहकांसाठी लागू करण्यात आले नसून, केवळ सरकारी कार्यालयात हे मीटर बसवण्यात येणार असल्याचं
महावितरणकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महावितरणच्या सुधारित वितरण क्षेत्राच्या योजनेमुळे
राज्यातल्या ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर वाहिन्यांचं विलगीकरण, वितरण हानी कमी करणं, वितरण प्रणालीचं सक्षमीकरण
आणि स्मार्ट मीटरिंग यासारखे कार्यक्रम महावितरणनं हाती घेतले असल्याचं प्रसिद्धी पत्रकात
म्हटलं आहे.
****
नांदेडहून
पुणे आणि नागपूरसाठी विमानसेवा कालपासून सुरू झाली. सकाळी साडे दहा वाजता नांदेडहून
निघणारे विमान पुण्याला साडे अकरा वाजता पोहोचेल, तर दुपारी एक वाजून दहा मिनिटांनी निघणारं विमान
नागपूरला दुपारी दोन वाजता पोहोचेल. आठवड्यातून सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवार असे चार दिवस ही विमानसेवा
सुरू राहणार आहे.
****
टी
-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान
होणार आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीत इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत भारताने अंतिम
फेरीत धडक मारली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने निर्धारित षटकात सात
बाद १७१ धावा केल्या. रोहीत शर्मानं ५७, सूर्यकुमार यादवनं ४७, हार्दिक पंड्यानं २३ धावा
केल्या.
प्रत्यूत्तरादाखल
आलेला इंग्लंडचा संघ १७व्या षटकात १०३ धावांवर सर्वबाद झाला. कुलदीप यादव आणि अक्षर
पटेलनं प्रत्येकी तीन, तर जसप्रित बुमराहनं दोन गडी बाद केले. तीन बळी घेणारा
आणि सहा चेंडुत दहा धावा करणारा अक्षर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
दरम्यान, काल सकाळी झालेल्या पहिल्या
उपान्त्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानचा नऊ गडी राखून पराभव करत अंतिम फेरी
गाठली.
****
दुधाला
किमान ४० रुपये दर आणि अनुदान मिळावं या मागणीसाठी दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने
आजपासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढीसंदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी
आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक उद्या शनिवारी विधानभवनात होणार आहे.
****
आषाढी
वारीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून पंढरपूरकडे निघालेली संत नामदेव महाराजांची
दिंडी काल हिंगोली शहरात पोहोचली. शहरातल्या रामलीला मैदानावर पालखीचं पहिलं रिंगण
पार पडलं. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
संत
मुक्ताबाईंच्या पालखीचं काल जालना जिल्ह्यात आगमन झालं. या पालखीच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी
भाविकांनी गर्दी केली होती. जालना जिल्ह्यात ही पालखी दोन दिवस मुक्कामी राहणार आहे.
शेगावच्या
श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचं काल सकाळी परभणी शहरात आगमन झालं. दिवसभर पालखीची
वाजत गाजत शहरात मिरवणूक काढण्यात आली. आज ही पालखी गंगाखेडकडे प्रस्थान ठेवत आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गुंठेवारी कायदा रद्द
करण्याच्या मागणीचं निवेदन महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना देण्यात आलं. माजी
खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह नागरिकांच्या शिष्टमंडळानं दिलेल्या या निवेदनावर
योग्य तो निर्णय घेऊ, असं महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आलं.
****
कर्जमाफीसाठी
मागील चार दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यातल्या ताकतोडा इथं शेतकऱ्यांचं उपोषण सुरु आहे.
शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करावा, वंचित सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा तसंच
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा या मागण्यांसाठी हे उपोषण सुरू केलं आहे.
****
परळी
- पूर्णा - परळी प्रवासी गाडी आजपासून येत्या आठ जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
तर धर्माबाद मनमाड ही गाडी धर्माबाद ते नांदेड दरम्यान रद्द करण्यात आली आहे .
****
No comments:
Post a Comment