Saturday, 29 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 29.06.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२९ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशांतर्गत विमान वाहतुकीत भारत जगातला तिसरा देश ठरला आहे. अमेरिका आणि चीननंतर भारताने हा मान मिळवला आहे. ऑफिशिअल एअरलाइन गाईड म्हणजे ओएजी या विमान वाहतुकीबाबत विश्लेषण करणाऱ्या संस्थेनं ही माहिती दिली आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, इंडिगो आणि एअर इंडियासारख्या कंपन्यांनी त्यांच्या ताफ्यात वाढ केल्यामुळे भारताचं स्थान पुढे गेल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

****

५२ दिवसांच्या अमरनाथ यात्रेला आज पहाटे पहलगाम आणि बालताल या दोन्ही ठिकाणाहून सुरुवात झाली. काश्मीर खोऱ्यातून प्रवासमार्ग असलेल्या या यात्रेसाठी चोख सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, सुमारे चार हजार यात्रेकरुंचा दुसरा जत्था जम्मूतल्या भगवती नगर यात्री निवासातून आज पहाटे काश्मीरकडे रवाना झाला.

****

केंद्र सरकारने भविष्य निर्वाह निधी योजनेतल्या तरतुदींमध्ये बदल केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा सहा महिन्यांपेक्षा कमी राहीली आहे, त्यांनाही या योजनेतल्या रक्कम काढण्याची सुविधा त्यामुळे मिळणार असून, सात लाख कर्मचाऱ्यांना या बदलांचा फायदा होणार आहे.

****

योगाचा आशियाई क्रिडा स्पर्धेत समावेश करण्याच्या निर्णयाचं केंद्रीय युवक कल्याण आणि क्रिडा मंत्री मनसुख मांडविय यांनी स्वागत केलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष डॉ. पी टी उषा यांनी हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातलं पत्र त्यांनी आशियाई ऑलिम्पिक मंडळाचे अध्यक्ष राजा रणधीर सिंग यांना पाठवलं आहे.

****


पुण्यातल्या अंमली पदार्थ सेवन प्रकरणी पोलिसांनी तीन अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यातला एकजण नायजेरीन तर दोन पुण्यातले आहेत. यातल्या एका आरोपीने एल 3 हॉटेलच्या पार्टीमध्ये ड्रग्ज पुरवले होते. याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

****

नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यात कडवंची गावाजवळ दोन कारच्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. अपघातातल्या जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये मुंबईतल्या मालाड इथल्या तीन जणांचा तर बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा इथल्या तीन जणांचा समावेश आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...