Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 25
September 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ सप्टेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
जागतिक स्तरावर अडथळे आणि अनिश्चितता असूनही, भारताचा विकास उल्लेखनीय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात ग्रेटर नॉयडामध्ये आज उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय
व्यापार मेळावा-२०२५ चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारताला आत्नमिर्भर बनवणं
आवश्यक असून, जी वस्तु आपण आपल्या देशात बनवू
शकतो, ती बनवलीच पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं. भारताच्या फिनटेक क्षेत्रावर भर
देऊन पंतप्रधानांनी, फिनटेकमुळे समावेशकतेला
प्रोत्साहन मिळत असून, भारत येत्या दशकांसाठी
भक्कम पाया घालत असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले,
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दरम्यान, पंतप्रधान मोदी आज राजस्थानच्या दौर्यावर जाणार असून, एक लाख २२ हजार १०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं
भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. १९ हजार २१० कोटी रुपये खर्चाच्या हरित ऊर्जा प्रकल्पांचं
उद्घाटन आणि फलोदी, जैसलमेर, जालोर आणि सीकर इथं सौर प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या
हस्ते होणार आहे.
****
राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाद्वारे
विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी काढले आहेत. यासंदर्भात लिहिलेल्या पत्रामध्ये महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये महसूल
विभागानं महत्त्वाची भूमिका बजावल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भूमी अभिलेखांचं डिजीटलीकरण, पारदर्शी सेवा वितरण यासारख्या क्षेत्रामध्ये या विभागाचं
योगदान प्रशंसनीय असून, नागरिकांना विविध सुविधा घराघरापर्यंत पोहोचत असून, शासनाप्रती त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. सशक्त
नागरिक, सक्षम महाराष्ट्र आणि विकसित भारत
हा संकल्प पूर्ण करण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान महत्त्वाची भूमिका
बजावेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त
केला.
दरम्यान, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधानांच्या या पत्राबद्दल
आभार व्यक्त केले आहेत.
****
भारतानं रेल्वे-आधारित मोबाइल लाँचर सिस्टमवरून मध्यम-श्रेणीच्या
अग्नि-प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज, अशा या पुढच्या पिढीतील क्षेपणास्त्राची मारक क्षमता २०००
किलोमीटर आहे. विशेषतः डिझाइन केलेल्या रेल्वे-आधारित मोबाइल लाँचरवरून केलं जाणारं
हे पहिलंच प्रक्षेपण आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी क्षेपणास्त्राच्या यशस्वी
चाचणीबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संघटना, स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आणि सशस्त्र दलांचं अभिनंदन केलं
आहे.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्याती पूरग्रस्त
पाहणी दौऱ्याची सुरुवात मौजे पिंपळगाव घाटपासून केली. त्यानंतर त्यांनी मौजे खोकरमोहा
गावाला भेट दिली. याठिकाणी फुटलेल्या तलावाची पाहणी केली आणि झालेल्या नुकसानीचा आढावा
घेतला. त्यानंतर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला भेट देऊन, शाळेबद्दल असलेल्या प्रस्तावित मागण्या पूर्ण करण्यासाठी तातडीनं
पावलं उचलली जातील, असं आश्वासन दिलं.
सरकार शेतकर्यांच्या पाठीशी असून, सर्व ती मदत केली जाईल, असं आश्वासन पवार यांनी यावेळी दिलं.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी हिंगोली जिल्ह्यात
कनेरगाव आणि अंबाळा इथं नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.
****
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून, सरकारने शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये
मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते
विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांना
जास्त मदत केली पाहिजे, यासाठी सहा महिन्याचा आमदार वेतन मुख्यमंत्री सहायता कक्षाला
देणार असून, सर्वपक्षीय आमदारांनी देखील आपलं
वेतन द्यावं, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलं.
अतिवृष्टीग्रस्त भागांत राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणीही त्यांनी केली.
****
पूरग्रस्त भागामध्ये सरकार म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री
आणि सरकारचे मंत्री भेट देत असून पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करत असल्याचं, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.
ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. पूरग्रस्तांच्या समस्येवर राजकारण करणे योग्य
नाही, असं ते म्हणाले.
****
सेवा पर्व उपक्रमाच्या अनुषंगाने 'एक दिवस, एक तास, एक साथ,' या श्रमदान उपक्रमात आज महाश्रमदान अभियानाचं नियोजन देशभरात
करण्यात आलं आहे. वाशिम रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांच्यावतीने एक तास श्रमदान
करून रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ केला.
परभणी जिल्ह्यातल्या पिंगळी इथं स्वच्छता अभियान राबवण्यात
आलं. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी उपस्थित होत्या.
****
No comments:
Post a Comment