Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 30 September 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे या आठवडाअखेर
पूर्ण करणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
·
जिल्हा नियोजन समितीचा १० टक्के निधी आपत्कालीन परिस्थितीसाठी
वापरण्यास राज्य सरकारची परवानगी
·
राज्यशासनाच्या अभिनव धोरणांमुळे औद्योगिक गुंतवणूकीत
महाराष्ट्र अव्वल-उद्योग मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन
आणि
·
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात, भारत-श्रीलंका
पहिली लढत
****
राज्यात
अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे या आठवडाअखेर पूर्ण होतील. दिवाळीपूर्वी
सरकार शेतकऱ्यांना मदत करेल असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.
ते काल नागपूर इथं बोलत होते. सर्वांचं समाधान होईल, असा निर्णय मुख्यमंत्री
घेतील, असं बावनकुळे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
बाईट - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
****
जिल्हा
नियोजन समितीच्या मंजूर निधीपैकी १० टक्के निधी अतिवृष्टी, गारपीट किंवा
पाणी टंचाई यासारख्या परिस्थितीसाठी वापरण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली आहे. यासंदर्भातला
शासन आदेश नियोजन विभागानं काल जारी केला. हा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्याचे
अधिकार पालकमंत्र्यांना असतील, असं या आदेशात म्हटलं आहे.
**
अतिवृष्टीमुळे
विभागात विस्कळीत झालेलं जनजीवन आणि जीवीत तसंच वित्तीय हानीबाबत हा संक्षिप्त आढावा...
बाईट -
दरम्यान, जालना जिल्ह्यात
काल संध्याकाळपर्यंत अंबड, घनसावंगी आणि परतूर तालुक्यातल्या
२६ गावांमधल्या ९९१ कुटुंबातल्या सात हजार सातशे ३३ नागरिकांना जिल्हा प्रशासनानं २२
ठिकाणी उभारलेल्या शिबिरांमध्ये स्थलांतरित केलं आहे.
****
अतिवृष्टीग्रस्तांच्या
मदतीसाठी मुंबईच्या श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली
आहे.
****
धाराशिव
जिल्हा परिषदचे शिक्षक पूरग्रस्तांसाठी एक कोटी सहा लाख रुपये इतकी मदत देणार आहेत.
तर, जनता सहकारी बँकेकडून धाराशिव जिल्ह्यासाठी १० लाख, लातूर, सोलापूर, बीड आणि बीदर या
जिल्ह्यांसाठी प्रत्येकी पाच लाख रुपये अशी एकूण ३० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
प्रगती सहकारी पतसंस्था पूरग्रस्तांसाठी दोन लाख रुपयांहून अधिकची मदत देणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती तसंच संचालक मंडळानं आपलं एक
महिन्याचं मानधन मुख्यमंत्री मदत निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे.
****
नांदेड
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यातल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना मंजूर निधीचं वाटप करण्यात येत
आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
यांनी केलं आहे.
****
परभणीचे
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी काल मानवत तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी
केली. यावेळी त्यांच्या हस्ते बाधितांना धान्याचं वाटपही करण्यात आलं.
****
दरम्यान, शेतकऱ्यांना
तुटपुंजी मदत जाहीर करून राज्य सरकार शेतकऱ्यांची चेष्टा करीत असल्याची टीका,
माजी मंत्री अमित देशमुख यांनी केली आहे. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत
बोलत होते. केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी स्पेशल पॅकेज जाहीर करण्याची मागणी देशमुख
यांनी केली.
****
खासदार
संदिपान भुमरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण आणि गंगापूर तालुक्यात
स्थलांतरित कुटुंबांची भेट घेत समस्या जाणून घेतल्या. जास्तीत जास्त मदतीचं आश्वासन, भुमरे यांनी
दिलं.
****
राज्यात
पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली असली, तरी धरणांतून पाण्याचा विसर्ग अद्यापही
सुरू आहे. जायकवाडी धरणातून एक लाख ७९ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
सुरू आहे. तर, मांजरा धरणातून दोन लाख ७१ हजार ६६ घनफूट प्रतिसेकंद
वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
उद्योग
क्षेत्राच्या विकासासाठी राज्यशासन राबवत असलेल्या अभिनव धोरणांमुळे संपूर्ण देशात
महाराष्ट्र राज्य औद्योगिक गुंतवणूकीत अव्वल असल्याचं प्रतिपादन, उद्योग मंत्री
उदय सामंत यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं ऑरिक सिटीचा सहावा र्धापन दिन
तसंच समृद्धी महामार्ग ते शेंद्रा औद्योगिक वसाहत जोडमार्गाचे लोकार्पण सामंत यांच्या
हस्ते साध्या पद्धतीनं करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. ऑरिक
सिटीचं बोधचिन्ह, संकेतस्थळ तसंच पोर्टलचं अनावरण तसंच ऑरिक सिटीच्या
सहा वर्षाच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही काल सामंत यांच्या
हस्ते करण्यात आलं. यावेळी झालेल्या निर्णयांची माहिती सामंत यांनी दिली...
बाईट - उद्योग मंत्री उदय सामंत
****
राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचे अर्ज भरण्यास २० ऑक्टोबरपर्यंत
मुदतवाढ दिली आहे. ही मुदत आज संपणार होती. बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना
१५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे तर नवीन परीक्षा केंद्रासाठी १० ऑक्टोबरपर्यंत
अर्ज करता येणार आहेत.
****
सेवा आणि
सुशासनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन
आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. 'सेवा पर्व'
या विशेष मालिकेच्या आजच्या भागात सरकारनं केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील
सुधारणांविषयी जाणून घेऊया.
‘‘गेल्या अकरा वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दर्जेदार शिक्षण,
आधुनिक कौशल्ये, रोजगार आणि यशस्वी उद्योजक होण्यासाठी
युवकांना सक्षम करण्यासाठी समर्पित प्रयत्न केले. शाळांपासून विद्यापीठांपर्यंत आपली
शिक्षण व्यवस्था बळकट करण्यात जलद प्रगती केली. निपुण भारत मिशन, पीएम श्री योजना, यामुळे शिक्षणात लवचिकता, बहुविद्याशाखा आणि आंतरराष्ट्रीयीकरणाला प्रोत्साहन मिळत आहे. आयआयटी,
आयआयएम आणि एम्स सारख्या संस्थांमध्ये मोठ्या सुधारणा आणि विस्तार करण्यात
येत आहे.
जुलै २०२० मध्ये, सरकारनं शालेय
शिक्षण आणि तंत्र शिक्षणासह उच्च शिक्षणात विविध सुधारणा घडवून
आणण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात आणलं.
बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सरकारच्या प्रयत्नांमुळं, विद्यापीठं
आणि महाविद्यालयांसह उच्च शिक्षण संस्थांची संख्या २०१४-१५ मध्ये
जे ५१ हजार होती, ती यावर्षी ७० हजारांहून
अधिक झाली आहे. वैद्यकीय शिक्षणालाही चालना मिळाली. २०१४ मध्ये एम्स संस्थांची संख्या ७ होती ती वाढून आता २३ झाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची
संख्या ३८७ वरून आता दोन हजारांपेक्षाही जास्त झाली आहे, यात सुमारे दोन
लाख वैद्यकीय जागा उपलब्ध आहेत.
सरकारच्या या प्रयत्नांतून
भारत आपल्या युवा लोकसंख्येला एका सशक्त आणि विकसित राष्ट्रासाठीच्या प्रेरक शक्तीमध्ये
परिवर्तित करत आहे.’’
****
स्थानिक
स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे
नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ते काल गोंदिया इथं पत्रकारांशी बोलत
होते. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय घेतला असल्याचं पटेल यांनी सांगितलं.
****
पदवीधर
मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला
आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नव्याने मतदार नोंदणी करावी, असं आवाहन
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे.
****
बंजारा
समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेड इथं काल जिल्हाधिकारी
कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तर, बीड इथं आदिवासी समाजाच्या वतीनं काल
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. धनगर, बंजारा
आणि इतर समाजांना अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये, यासह
अन्य मागण्यांचं निवेदन समाजाच्यावतीनं देण्यात आलं.
**
महिला एकदिवसीय
क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ होत आहे. गुवाहाटी इथं भारत आणि श्रीलंका
संघात पहिला सामना होणार आहे. दुपारी तीन वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दोन नोव्हेंबरला
स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येईल.
****
शारदीय
नवरात्र महोत्सवात काल तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा
मांडण्यात आली.
****
हवामान
राज्यात
आज नांदेड जिल्ह्याला तर उद्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात
आला आहे.
****
No comments:
Post a Comment