Sunday, 28 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 28.09.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 28 September 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी सण-उत्सव स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीसह साजरे करण्याचे आवाहन केलं आहे. आज आकाशवाणीवरील मन की बातच्या १२६ व्या भागात त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. ते म्हणाले -

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

लातूर-हडपसर या दसरा-दिवाळी विशेष रेल्वेला काँग्रेस पक्षाचे खासदार शिवाजी काळगे यांनी लातूर इथं आज हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केलं. या रेल्वेला मुरुड रेल्वे स्थानकातही थांबा मिळाला आहे.

****

राज्यातील पावसाच्या भीषणतेच्या अनुषंगानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी तसंच सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी आज सकाळी संपर्क करून पावसाच्या, मदतकार्याच्या स्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मदतकार्य जाणून घेत, मदत शिबिरांमध्ये भोजन- पाणी -आरोग्य व्यवस्था राखण्याचे आदेशही दिले. जनावरांसाठी चारा पुरवण्याचं तसंच, पावसामुळे धरणांचे विसर्ग वाढवल्यानं आधीच नागरिकांच्या सुरक्षितस्थळी स्थलांतरावर लक्ष केंद्रीत करण्याचंसुद्धा त्यांनी सांगितलं. तर, संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रभावित ठिकाणांवर उपस्थित राहून काम करण्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचित केलं आहे.

****

 

पैठण तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या पावसानं बाबुळगाव, केसापुरी, पैठण खेडा या खेड्यांचा संपर्क पुरामुळे तुटलेला आहे. पैठणच्या जायकवाडी प्रकल्प पाणलोट आणि धरण क्षेत्रात सुमारे दीडशे मिलिमीटर पाऊस झाल्यानं गोदावरी नदी पात्रात सव्वा लाख दशलक्ष घनमीटर इतका विसर्ग करण्यात येत आहे. हा विसर्ग दीड लाखांपर्यंतही जाऊ शकतो, अशी स्थिती आहे. आज सकाळी आठनंतर या धरणाचे एक ते नऊ असे आपत्कालीन दरवाजे अडीच फूटांपर्यंत उघडण्यात आले. नाथसागर जलाशयातून गोदापात्रात पाणी सोडल्यानं नाथ मंदिरामागील मोक्षघाट पूर्णपणे पाण्याखाली गेला.

लासूर इथं शिवना नदीच्या पुरामुळे देवीच्या मंदिर परिसरात दुकानात पाणी घुसन नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

****

लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यात मुसळधार पावसानं मन्याड नदीसह तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यानं अनेक गावांत पाणी शिरलं आणि अहमदपूर शहराशी अनेक गावांचा संपर्क तुटला होता. यातच चिलखा इथं मन्याड नदीच्या पुरात अडकलेल्या तीन मजुरांना सुखरुप ठिकाणी हलवण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यांत रात्रीपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडल्यानं आधीच पाणी पातळी अनियंत्रीत झालेल्या कयाधू नदीला महापूर आल्याची स्थिती आहे. कळमनुरी तालुक्यातील कोंढूर गावात पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

****

माजलगाव धरणातून सिंदफणा नदीपात्रात ४१ हजार ७०१ दशलक्ष घनमीटर असा आधीपेक्षा पन्नास हजारांहून कमी विसर्ग केला जात आहे. तर, उजनीमधून एक लाख दशलक्ष घनमीटर इतका विसर्ग होतो आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात लोणी खुर्द इथल्या इंदिरानगर भागात पाणी घुसून आज सकाळी गावाशी संपर्क तुटला. त्यामुळे नागरिकांना प्रशासनानं तात्काळ मदत करून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. कन्नड तालुक्याच्या देवगाव रंगारी इथं एका शेतात आज सकाळी खडकी नदीचं पाणी घुसल्यानं शेताचं मोठं नुकसान झालं. कन्नड तालुक्यात शिवना नदीला पूर आल्यानं शहरानजिकच्या लंगोटी महादेव मंदिर परिसरात पाणी शिरलं. यात मंदिर पूजाऱ्यासह सहा जण आणि तीन लहान मुले अडकली होती.

****

धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शंभरहून जास्त वर्गखोल्यांची पडझड तर अनेक खोल्यांचं, शाळा साहित्य- पोषण आहार असं मिळून तब्बल लाखांपेक्षाही जास्त रकमेच्या नुकसानीचा अंदाज आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुक्यातल्या सीना कोळेगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अहिल्यानगर, आष्टी, कडा, जामखेड, कर्जत या भागातील मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे सीना कोळेगाव धरणातून आज सकाळी दहा वाजता विसर्ग वाढवून ७० हजार २०० दशलक्ष घनमीटर प्रतिसेकंद याप्रमाणे करण्यात आला आहे.

****

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने रस्ता रुंदीकरणात घरं गेलेल्या नागरिकांसाठी विशेष योजना हाती घेतली आहे. एक कुटुंब, एक घर या योजनेअंतर्गत म्हाडाची १४८ घरं या बाधितांना मोफत देण्यात येणार आहेत. शिवाय ज्या बाधित कुटुंबांकडे अन्यत्र भूखंड असेल, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून अडीच लाख रुपये देण्यात येणार आहेत.

****

नवि दिल्लीत आयोजित,१२ व्या दीव्यांगासाठीच्या जागतिक ॲथलेटीक्स विजेतेपद स्पर्धेत काल पहिल्याच दिवशी बिहारच्या सुनील कुमार यानं नव्या अशियायी विक्रमी लांब उडीचं अंतर कापून सुवर्ण पदक पटकावलं. याच स्पर्स्धेत भारताच्याच वरुण सिंह भाटी यानं कांस्य पदक जिंकलं.

****

No comments: