Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 July 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जुलै २०२० दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज सकाळी अकरा वाजता `मन की बात` या उपक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. आज साजरा
होत असलेल्या
कारगिल विजय दिनाबद्दल ते म्हणाले की,
२१ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी
कारगिल युद्धात आपल्या सैन्यानं भारताच्या विजयाचा ध्वज फडकावला होता. कारगीलचं युद्ध ज्या परिस्थितीत झालं, ती परिस्थिती देशाला कधीच विसरता येणार नाही. पाकिस्ताननं मोठ-मोठे बेत रचून भारताची
भूमी हिसकावून घेण्याचं आणि आपल्या अंतर्गत कलहापासून इतरांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नको ते दुस्साहस केलं
होतं, असं त्यांनी यावेळी नमुद केलं. कोरोना विषाणुचा देश
यशस्वी सामना करत असला
तरी या संसर्गाचा धोका अजून टळलेला नसल्याचं पंतप्रधान म्हणाले.
कोरोना विषाणू अनेक ठिकाणी वेगानं पसरत असून
आपण खूप जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. सुरुवातीला कोरोना विषाणूचा संसर्ग जितका
घातक होता, तितकाच तो आजही घातक आहे. चेहऱ्यावर
मास्कचा वापर करण, एकमेकांपासून किमान सहा फुटाचं अंतर राखण, सतत हात स्वच्छ करण, कुठेही
न थुंकण आणि आणि स्वच्छता राखण ही हत्यारंच या
संसर्गापासून आपलं रक्षण करू शकतील, असं पंतप्रधान म्हणाले. विविध
क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्यांचा त्यांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला तसंच
काही यशस्वी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. येत्या स्वातंत्र्य दिनी
आपण कोरोना विषाणू साथीच्या रोगापासून मुक्त होण्याचा,
आत्मनिर्भर देशाचा तसंच काही नवं शिकण्याचा आणि शिकवण्याचा, कर्तव्यांचं पालन करण्याचा संकल्प करू, असं पंतप्रधान मोदी यांनी नमुद
केलं. `मन
की बात` या शृंखलेचा हा सदुसष्ठावा
भाग होता.
****
देशात
कोरोना विषाणुचे नवे ४८ हजार ६६१ रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची संख्या तेरा लाख ८५ हजार
५२२ झाली असून यातले आठ लाख ८५ हजार ५७६ रुग्ण बरे झाले आहेत. देशात चार लाख ६७ हजार
८८२ रुग्ण कोरोना विषाणुवर उपचार घेत आहेत. गेल्या चोवीस तासांमधे ७०५ रुग्ण या संसर्गामुळे
मृत्यूमुखी पडले असून एकूण मृतांची संख्या ३२ हजार ६३ झाली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज कोरोना विषाणुचे ३४ नवे रुग्ण आढळले. यात शहरातल्या ३१ तर वडगाव कोल्हाटी,
बजाज नगर आणि गंगापूर इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातली कोरोनाबाधित
रुग्णांची संख्या आता बारा हजार नऊशे बेचाळीस झाली आहे. त्यापैकी आठ हजार एकशे एकोणसाठ
रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. औरंगाबाद मध्ये आतापर्यंत ४३७ कोरोनाबाधित रुग्णांचा
मृत्यु झाला असून सध्या चार हजार तीनशे सेहेचाळीस रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे १३ रुग्ण आढळले असून
उपचार घेत असलेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणुचे सहाशे सेहेचाळीस रुग्ण आढळले आहेत. या आजारातून ४१४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या
उस्मानाबादमधे १९५ रुग्ण उपचार घेत असून कोरोना विषाणुमुळे
आतापर्यंत ३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ जवळच्या कलांडी गावानजिक दुचाकींच्या अपघातात राज्य राखीव
दलाचे पोलीस गणपत बाबुराव राठोड मृत्यूमुखी पडले. काल रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास
हा अपघात झाला. ते औंढा नागनाथ तालुक्यातल्या काठोडा तांडा इथले रहिवासी होते आणि नागपंचमी
निमित्त गावाकडे कुटुंबाला भेटायला आले होते. पोलिस गणपत राठोड हे हिंगोलीला बटालियनकडे
जात असताना हा अपघात झाला.
****
कारगिल
विजय दिन आज देशभर साजरा केला जात आहे. या निमित्तानं आज उस्मानाबाद इथं हुतात्म्यांना
आदरांजली वाहण्यात आली. शहरातल्या नगरपालिका जवळच्या शहिद स्मारकाला निवासी जिल्हाधिकारी
राजेंद्र खंदारे आणि अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांनी पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना
अभिवादन केलं.
****
नांदेड जिल्ह्यात काल मध्यरात्री देगलूर, बिलोली,
नायगाव, धर्माबाद, मुखेड, अर्धापूर आणि कंधार या तालुक्यात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा
पाऊस पडला. देगलूर इथं सर्वाधिक ६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
****
महाराष्ट्र
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र २०२० मधल्या विविध विद्याशाखांच्या पदवीपूर्व
विद्यार्थ्यांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक
डॉ. अजित पाठक यांनी नाशिक इथं दिली आहे.
//***********//
No comments:
Post a Comment