आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ जुलै २०२० सकाळी ११.०० वाजता
****
देशात कोरोना विषाणूचे नवे
४८ हजार ९१६ रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची एकूण संख्या तेरा लाख ३६ हजार ८६१ झाली आहे.
****
देशातल्या बरे झालेल्या रुग्णांची
संख्या आठ लाख ४९ हजार ४३१ आहे. कोरोना विषाणूचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६३ पूर्णांक
५४ शतांश टक्के आहे.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गावर
सध्या चार लाख ५६ हजार ७१ रुग्ण उपचार घेत आहेत.
****
कोरोना विषाणू संसर्गामुळे
देशात गेल्या चोवीस तासांमधे ७५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी
पडलेल्या रुग्णांची संख्या ३१ हजार ३५८ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
कोरोना विषाणूचे ४० नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामधे २२ रुग्ण महापालिका हद्दीतले,
तर १८ रुग्ण ग्रामीण भागातले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत
बारा हजार ७११ रुग्णांना कोरोना विषाणुची लागण झाली आहे. यापैकी सात हजार ७५३ रुग्ण
उपचारानंतर बरे झाले असून ४३२ रुग्ण मरण पावले आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसंच औरंगाबाद जिल्ह्यातल्या लोक प्रतिनिधींच्या
उपस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाचा आढावा घेण्यासाठी औरंगाबादमधे आज एक बैठक होत आहे.
****
जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचे
३३४ नवे रूग्ण आढळून आले त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या ९ हजार १८३ झाली आहे.
नव्या रुग्णांतील सर्वाधिक ९० रूग्ण जळगाव शहरातले आहेत. शहरातली रुग्ण संख्या दोन
हजार ३६४ झाली आहे. गेल्या चोवीस तासांमधे जळगावमधे दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोरोना
विषाणूबाधित ४४ रुग्णांना आज यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. यामधे अहमदनगर शहरातल्या
अकरा, संगमनेर शहरातल्या दहा, श्रीगोंदा, राहता इथल्या प्रत्येकी सात, पारनेर, श्रीरामपूरच्या
प्रत्येकी दोन आणि अकोले, पाथर्डी, कर्जतमधल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment