Tuesday, 22 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.09.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

देशात आज कोविड बाधितांच्या संख्येत ७५ हजार ८३ ने वाढ झाली. त्यामुळे कोविडग्रस्तांची एकूण संख्या ५५ लाख ६२ हजार ६६३ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात एक हजार ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ८८ हजार ९३५ झाली आहे.

****

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं आज सातारा इथं निधन झालं. एका मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं, त्यांच्यावर सातारा इथं एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ८५ झाली आहे. आजपर्यंत एकूण ८७९ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे, २४ हजार २८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण ५ हजार ९२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

काँग्रेसच्या राज्यसभेतील आठ खासदारांचं काल झालेलं निलंबन जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत काँग्रेसचे सदस्य राज्यसभेच्या कामकाजात भाग घेणार नाहीत असं काँग्रेसचे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी विरोधकांना या बहिष्काराच्या निर्णयाचा पुनर्विचार करून कामकाजात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

****

कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर सुध्दा नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे भाव फार कमी झालेले नाहीत. निर्यात बंदीमुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक घटली असून त्यामुळे दर वाढल्याचं या बाबतच्या बातमीत म्हटलं आहे.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...