आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ नोव्हेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय जनता पक्ष आज राज्यभरात वीज देयक होळी आंदोलन
करत आहे. टाळेबंदीच्या काळातली वीज देयकं माफ करण्याचं आश्वासन मोडून महाविकास आघाडी
सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करत असल्याचं, भाजपा प्रदेश
माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
नागपूरमधल्या महादुला इथं आज सकाळी राज्याचे माजी ऊर्जा मंत्री आणि भाजपचे
महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी वीज देयकाच्या प्रती
जाळल्या. राज्यभरात २ हजार ठिकाणी भाजप हे आंदोलन करत असल्याची माहिती बावनकुळे यांनी
यावेळी दिली.
****
राज्यात प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला
आघाडी सरकारनं स्थगिती दिल्याचा खोटा प्रचार सध्या सुरू असल्याचं,
उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सांगली इथं झालेल्या संयुक्त प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. सध्याची निवडणूक आचारसंहिता
संपल्यानंतर प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं ते म्हणाले.
****
राज्यात ६ मतदार संघांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका
असताना विधान परिषदेतल्याच नामनिर्देशित सदस्यांची यादी राज्यपालांनी जाहीर करू नये,
अशी मागणी नागपूर इथले ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांनी केली आहे. ही नावं आत्ता
जाहीर झाली, तर तो आचारसंहिता भंग ठरू शकतो, येत्या एक डिसेंबरला निवडणुकीचं मतदान
होईपर्यंत या नियुक्त्यांची घोषणा केली जाऊ नये, असं पाठक यांनी म्हटलं आहे.
****
नांदेड इथं येत्या १० ते
२५ डिसेंबर या कालावधीत मोफत धनुर्विद्या प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार आहे. या शिबीरात
सहभागी होण्यासाठी सकाळी ७ ते १० या वेळेत श्री गुरू गोविंदसिंघजी स्टेडियम इथं नावनोंदणी
करता येईल, अशी माहिती क्रीडा प्रशिक्षक बालाजी जोगदंड यांनी दिली आहे.
****
राज्यात नववी ते बारावीच्या
शाळा आजपासून सुरू होत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात महापालिका क्षेत्र वगळता, जिल्ह्यातल्या
शाळा आजपासून सुरू होत आहेत. मात्र, जिल्ह्यात पैठण इथल्या जिल्हापरिषदेच्या बहुतांश
शाळांमध्ये एक ही विद्यार्थी हजर नसल्याचं दिसून आलं. शाळा सॅनिटाईज करण्यात आल्या
शिक्षकही वेळेवर हजर होते.
//************//
No comments:
Post a Comment