आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२६ नोव्हेंबर २०२० सकाळी
११.०० वाजता
****
संविधान
दिवस आज साजरा होत आहे. २६ नोव्हेंबर १९४९ ला देशाच्या संविधान सभेनं संविधानाचा स्वीकार
केला होता, हे संविधान २६ जावेवारी १९५० रोजी लागू झालं.
भारताची
एकता आणि विकसनशीलतेची सगळ्यात मोठी शक्ती आपलं प्रगतीशील संविधान असल्याचं केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानशिल्पी डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो, असं शहा यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनीही संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संविधानानं दिलेल्या
स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या विचारांचा अवलंब करुन, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता
अबाधित राखणं, देशाला एकजूट ठेवणारी सर्वधर्मसमभावाची भावना अधिक दृढ करणं, हे आपलं
नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या केवाडिया इथं पीठासीन अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय संमेलनाच्या
समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या
संमेलनाचं उद्घाटन झालं होतं.
****
मुंबईवर
झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाली. केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांनी या हल्ल्यात प्राण गमावणाऱ्या नागरिकांना आणि वीर जवानांना श्रद्धांजली
अर्पण केली आहे.
राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळी
या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली.
****
शेतकरी
विरोधी कृषी कायदे तसंच कामगार विरोधी चार श्रमसंहिता रद्द कराव्यात, या आणि इतर मागण्यांसाठी
देशभरातल्या १० केंद्रीय कामगार संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला
२५० पेक्षा ही जास्त किसान संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
****
कार्तिकी
एकादशीचा सोहळा आज भक्तिभावानं साजरा होत आहे. यानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर इथं
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते
आज पहाटे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment