आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२८ नोव्हेंबर २०२० सकाळी
११.०० वाजता
****
कोविड-19
च्या लसनिर्मितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदाबाद इथल्या जायड्स
बायोटेक पार्क या संस्थेत दाखल झाले असून, तिथल्या लस निर्मितीचा आढावा आहेत. पंतप्रधान
आज हैदराबाद इथली भारत बायोटेक आणि पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थांनाही
भेट देणार आहेत. वायू दलाच्या विशेष विमानानं पंतप्रधान दुपारी पुण्याच्या लोहगाव विमानतळावर
दाखल होतील. तिथून ते हेलिकॉप्टरने मांजरी इथल्या सीरम इन्स्टिट्यूट परिसरात पोहोचतील.
सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह तिथले शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी
लसनिर्मितीतली प्रगती, आव्हानं आणि इतर बाबीसंदर्भात पंतप्रधान संवाद साधणार आहेत.
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोव्हिशील्ड ही लस विकसित होत आहे.
****
राज्यात
प्रतिबंधित क्षेत्रात ३१ डिसेंबरपर्यंत टाळेबंदी कायम राहणार आहे. राज्य सरकारने काल
याबाबत आदेश जारी केले. ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी जारी करण्यात आलेले दिशा निर्देश
३१ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. हिवाळ्यात कोविड प्रादुर्भाव अधिक वाढण्याचा धोका
असल्यानं, हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंढरपूर-मंगळवेढा
विधानसभा मंतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत नाना भालके याचं
काल रात्री उपचारादरम्यान पुण्यात निधन झालं, ते ६० वर्षांचे होते. आमदार भालके यांनी
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचं तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं. पंढरपूर तालुक्यातल्या गुरसाळे
इथल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्षही होते. त्यांच्या पार्थिव
देहावर आज सरकोली इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
गोंदिया
जिल्ह्यात वाघाच्या शिकारी प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयानं तिघांना
आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जंगली डुकरांच्या शिकारीसाठी लावलेल्या
विजेच्या तारांचा धक्का बसून, एका तीन वर्षीय वाघाचा मृत्यू झाला होता, ही बाब उघड
होऊ नये, यासाठी आरोपींनी वाघाचे तुकडे करून फेकून दिल्याचं समोर आलं आहे. या आरोपींवर
यापूर्वीही वन्य जीवांची हत्या करण्याचे गुन्हे दाखल आहेत.
****
No comments:
Post a Comment