Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 November 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ नोव्हेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
गेल्या २४
तासात देशभरात कोविड संसर्ग झालेले ४४ हजार ५९ रुग्ण आढळले, त्यामुळे
देशात कोविड बाधितांची संख्या ९१ लाख ३९ हजार ८६६ झाली आहे. यापैकी ८५ लाख ६२ हजार
६४२ रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे देशाचा
कोविडमुक्तीचा दर ९३ पूर्णांक ६८ शतांश टक्के झाला आहे. काल दिवसभरात देशात ५११
रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला, त्यामुळे देशभरात या संसर्गाने झालेल्या
मृत्यूंची एकूण संख्या एक लाख ३३ हजार ७३८ झाली आहे.
****
राज्यात
अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची
तपासणी करूनच शाळा महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात आला. सातारा जिल्ह्यात नववी दहावीच्या
विद्यार्थ्यांची उपस्थिती जेमतेम असून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या
प्रमाणात असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
सांगली
जिल्ह्यातल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्त हजेरी लावली आहे. बहुसंख्य पालकांची
संमती पत्रं घेऊन शाळा सुरू करण्यात आल्या. त्यापूर्वी शिक्षकांची कोविड तपासणी करण्यात
आली, यात २२ शिक्षकांना कोविड संसर्ग झाल्याचं निदर्शनास आलं आहे.
वाशिम
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही नववी ते बारावीचे वर्ग आज पासून सुरू झाले. शासनाच्या
सर्व सूचनांचे पालन करत शाळेत अध्यापन सुरू झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यात महापालिका क्षेत्र वगळता, जिल्ह्यातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. मात्र,
जिल्ह्यात पैठण इथल्या जिल्हापरिषदेच्या बहुतांश शाळांमध्ये एक ही विद्यार्थी हजर नसल्याचं
दिसून आलं.
****
वीज
देयकांसदंर्भात आश्वासन देऊनही राज्य सरकारनं कुठलीही सवलत दिली नसल्याबद्दल विधानसभेचे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोविडची दुसरी लाट शक्यतो येवूच नये, मात्र सध्या रुग्ण नसलेली कोविड केंद्र बंद न
करता यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना त्यांनी केली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातले भाजपचे बंडखोर उमेदवार रमेश पोकळे यांचा आणि भाजपचा काहीही
संबंध नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
भारतीय जनता पक्ष आज राज्यभरात
वीज देयक होळी आंदोलन करत आहे. टाळेबंदीच्या काळातली वीज देयकं माफ करण्याचं आश्वासन
मोडून महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करत
असल्याचं, भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी
पत्रकात म्हटलं आहे.
उस्मानाबाद
इथं जिल्हाध्यक्ष
नितीन काळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर
हे आंदोलन केलं. ठाकरे सरकार विरोधात
जोरदार घोषणाबाजी करत वीज देयकांची होळी करण्यात आली.
धुळे
इथं माजी संरक्षण राज्य मंत्री खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन
करण्यात आलं. यावेळी आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करत वीज देयकांची होळी करण्यात
आली.
****
सांगली महापालिका क्षेत्रातल्या वीज
देयकात ३१ लाख ८३ हजार ५१० रुपयांचा अपहार
झाल्याचं उघडकीस आलं आहे. सांगली
महापालिकेकडून वीज देयकासाठी २०१९-२०या काळात दोन बँकांमध्ये धनादेश जमा करण्यात
आले. मात्र मूळ देयकात आणि
औद्योगिक ग्राहकांच्या यादीत फेरफार करण्यात आला, असं चौकशीत स्पष्ट झालं आहे. या संदर्भात
महापालिकेचे विद्युत अभियंता अमरसिंह वसंतराव चव्हाण यांच्या
तक्रारीवरून एक पतसंस्था, बँक अधिकारी, कर्मचारी, महावितरणचा एक कंत्राटी कर्मचारी यांच्याविरोधात
गुन्हा दाखल झाला आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तान
सीमेवर वीरमरण आलेले सैनिक हवालदार संग्राम पाटील यांच्या पार्थिव देहावर आज कोल्हापूर जिल्ह्याच्या
करवीर तालुक्यात निगवे खालसा या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात
हवालदार संग्राम शिवाजी पाटील हुतात्मा झाले होते.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोविडबाधित रुग्णांची संख्या ४२ हजार ३५९ झाली आहे. यापैकी ४० हजार पाचशे
दोन रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात ७२३ रुग्णांवर उपचार
सुरू आहेत
//***********//
No comments:
Post a Comment