Tuesday, 24 November 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.11.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ नोव्हेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

देशात गेल्या २४ तासांत ४२ हजाराच्यावर कोविड बाधितांना रूग्णालयातून बरे झाल्यानं सुटी देण्यात आली तर ३८ हजार नवीन कोविड बाधितांची नोंद झाली. सध्या चार लाख ३८ हजार ६६७ रूग्ण देशातल्या विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत ११ लाख कोविड चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत एकूण कोविड चाचण्यांची संख्या १३ कोटी ३७ लाख एवढी झाली आहे.

****

सरकारनं निवृत्त धारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठीची मुदत पुढील वर्षीच्या २८ फेब्रुवारी पर्यंत वाढवली आहे. या आधी ही मुदत एक नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत होती. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर, निवृत्ती धारकांच्या संघटनेकडून आणि वैयक्तिक स्वरूपात देखील ही मुदत वाढवण्यासाठी मागणी करण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

****

कार्तिकी एकादशी आणि कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला आहे. दरम्यान, कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुढचे दोन दिवस मुखदर्शन पास सेवा बंद राहणार आहे.

****

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबाद इथल्या चिकलठाणा विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आजपासून आरटीपीसीआर पद्धतीनं तपासणी करण्यात येणार आहे. महापालिकेचं एक पथक यासाठी विमानतळावर कार्यरत रहाणार आहे.

****

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीच्या मतदानाची नांदेड जिल्ह्यात संपूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी दिली. जिल्ह्यातल्या सर्व १२३ मतदान केंद्रावर कोविड-19 अंतर्गत खबरदारी घेण्यासाठी आरोग्य विभागाचे ३ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यावेळी थर्मामीटर, ऑक्सीमीटरद्वारे मतदारांची तपासणी केली जाणार आहे. मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ९०७ अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचं ते म्हणाले.

****

शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी समाजात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते होते.

****

No comments: