Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 December 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.
****
राज्यात
औरंगाबाद, पुणे आणि नागपूर पदवीधर मतदार संघ तसंच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघाच्या
निवडणुकीसाठी आज मतदान सुरु आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान चालणार असून, कोविड
बाधित मतदारांना शेवटच्या दोन तासांत मतदान करता येणार आहे.
औरंगाबाद
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विभागात
सकाळी दहा वाजेपर्यंत आठ पूर्णांक ४३ टक्के मतदान झालं. परभणी जिल्ह्यात दुपारी १२
वाजेपर्यंत २४ पूर्णांक २३ टक्के, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २० पूर्णांक ६४ टक्के मतदान
झालं. उस्मानाबाद शहरातल्या श्रीपतराव भोसले हायस्कूल मधल्या काही मतदान केंद्रावर
मतदानासाठी रांगा दिसून आल्या. बीड जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत दहा टक्के मतदान झालं.
हिंगोली जिल्ह्यात सकाळी दहा वाजेपर्यंत पाच पूर्णांक ९५ टक्के मतदान झालं.
जालना
जिल्ह्यात शांततेत मतदान सुरु आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मतदान
केंद्रावर आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.
औरंगाबाद
इथं या निवडणुकीतले महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे
आमदार अंबादास दानवे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
नागपूर
पदवीधर मतदारसंघासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत,
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं मतदान केलं.
नागपूर
पदवीधर मतदारसंघासाठी नागपूर विभागातल्या सहा जिल्ह्यांत सकाळी दहा वाजेपर्यंत आठ पूर्णांक
१६ टक्के मतदान झालं. पूर्व विदर्भातल्या अमरावती शिक्षक मतदारसंघात ११ वाजेपर्यंत
दहा पूर्णांक ११ टक्के मतदान झालं.
या
पाचही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी परवा तीन डिसेंबरला होणार
आहे.
****
धुळे-नंदुरबार
विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे.
भाजपतर्फे अमरिशभाई पटेल तर काँग्रेस पक्षातर्फे महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील
रिंगणात आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत ६९ पूर्णांक ११ टक्के मतदान झालं.
****
सीमा
सुरक्षा दलाचा ५६वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. देशाच्या नागरिकांचं रक्षण आणि नैसर्गिक
आपत्तीत मदत करून एक शौर्यवान दल म्हणून सीमा सुरक्षा दलानं स्वतःची ओळख निर्माण केली
असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारताला
सीमा सुरक्षा दलाचा अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
केंद्रीय
गृहमंत्री अमित शाह यांनीही सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. सीमा सुरक्षा दल - बीएसएफने
आपल्या शौर्य आणि पराक्रमाने आपले आदर्श वाक्य
‘जीवन पर्यंत कर्तव्य’ याचं सदैव पालन केलं, शूर जवानांना त्यांच्या राष्ट्रसेवा
आणि समर्पणासाठी आपण नमन करत असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे.
****
केंद्र
सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून, यावर
तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी
बैठक सुरु आहे. गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि संरक्षण मंत्री
राजनाथ सिंह या बैठकीला उपस्थित आहेत. सरकारनं शेतकरी आणि त्यांच्या नेत्यांशी चर्चा
करण्यास सरकार तयार असून, त्यासाठी आज दुपारी तीन वाजता बैठक बोलावली असल्याचं कृषी
मंत्री तोमर यांनी आज सकाळी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
****
देशात
काल दिवसभरात ३१ हजार ११८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ४८२ जणांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९४ लाख ६२ हजार ८१० झाली आहे. देशात आतापर्यंत
या विषाणू संसर्गानं एक लाख ३७ हजार ६२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ४१ हजार
९८५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ८८ लाख ८९ हजार
५८५ रुग्ण बरे झाले असून, सध्या चार लाख ३५ हजार ६०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल
नऊ लाख ६९ हजार ३२२ कोविड चाचण्या करण्यात आल्या, देशभरात आतापर्यंत १४ कोटी १३ लाख
४९ हजार २९८ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.
****
माजी
केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी काल उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे
अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांची भेट घेत विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांसह विविध मंत्रालयाच्या
संसदीय स्थायी समित्यांचे अहवाल सादर केले. यात विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूविज्ञान,
अणु ऊर्जा, बायोटेक्नोलॉजी, पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन मंत्रालयाच्या स्थायी
समित्यांचा अहवालाचा समावेश आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या वारंगा फाटा जवळ काल मोटरसायकल आणि ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वारांचा
जागीच मृत्यू झाला. पाठीमागून येणाऱ्या ट्रकने या दुचाकीला धडक दिल्याची माहिती पोलिसांकडून
देण्यात आली.
****
No comments:
Post a Comment