आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ डिसेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
राज्यातल्या सर्वच इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांना कोविड काळातल्या सेवेसाठी अतिरिक्त
भत्ता देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातले निर्देश दिले आहेत. यासंदर्भात विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाली. मुंबई आणि पुण्यातल्या इंटर्नशीप
करणाऱ्या डॉक्टरांना अनुक्रमे ३९ हजार रूपये आणि ३० हजार रूपये विशेष भत्ता दिला जात
होता, मात्र अन्य शहरांमध्ये तो केवळ ११ हजार रूपये इतकाच होता. सर्वच जिल्ह्यांसाठी
एकच निकष लावण्यात यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यानुसार संपूर्ण राज्यातल्या
इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांना कोविड काळातल्या सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देण्याचं आश्वासन
पवार यांनी दिलं.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २०२१ मध्ये घेण्यात
जाणार्या दहावीच्या परीक्षेसाठी आजपासून अर्ज भरता येणार आहेत. यंदा एप्रिल - मे मध्ये
दहावीची परिक्षा होण्याची शक्यता मंडळानं वर्तवली आहे. ११ जानेवारीपर्यंत हे अर्ज ऑनलाईन
स्वीकारले जातील.
दरम्यान, शिक्षण मंडळानं २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान घेतलेल्या दहावी आणि
बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होणार आहे. हा निकाल
दुपारी एक वाजता मंडळाच्या अधिकृत संकेस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
****
दिव्यांग व्यक्तीचे वैश्विक ओळखपत्र स्मार्ट कार्ड आता महाराष्ट्र राज्य परिवहन
महामंडळाच्या बस मध्ये प्रवास सवलत मिळण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सध्या प्रवास
सवलत मिळवण्यासाठी दिव्यांग व्यक्तीला जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयाकडून ओळखपत्र
घ्यावं लागतं. या ओळखपत्रावर आगार व्यवस्थापकाची सही आणि शिक्का प्राप्त झाल्यानंतरच
त्याला भाड्यामध्ये सवलत मिळते.
****
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधक प्रभावीपणे राबवण्यात येईल असा विश्वास
जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत
ते बोलत होते. लसीकरणाच्या प्रशिक्षणाबाबत सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी
यावेळी दिल्या.
****
नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत असून, आज आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment