आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० जानेवारी २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांची आज ७३ पुण्यतिथी. हा दिवस देशभरात हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात
येत आहे. दिल्लीतल्या राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधास्थळी प्रार्थना सभेचं
आयोजन करण्यात आलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचं
स्मरण करण्यासाठी देशात दोन मिनिट मौन पाळण्यत आलं.
राष्ट्रपती रामनाथ
कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींना
अभिवादन केलं आहे. गांधीजींच्या शांती, अहिंसा आणि विनम्रतेच्या मार्गाचा आपण सर्वांनी
अवलंब केला पाहिजे, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
गांधीजींचे आदर्श
आजही करोडो लोकांना प्रेरणा देत असल्याचं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी गांधीजींना अभिवादन केलं आहे. देशाच्या स्वातंत्र्यसाठी, देशाची एकता,
अखंडता, सार्वभौमतेच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या शहीद वीरांचे स्मरण करुन
उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनाही हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन केलं आहे.
****
कृषी कायद्यांसंदर्भात
सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या समितीनं काल १७ शेतकरी संघटनांसोबत चर्चा केली. महाराष्ट्रासह
११ राज्यांमधल्या संघटनांनी या चर्चेत सहभागी होत, कायद्यांसंदर्भात आपले विचार मांडले.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं नुकत्याच दिलेल्या
एका निकालाविरोधात भारतीय स्त्री शक्तीच्या लातूर शाखेनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली
आहे. अल्पवयीन मुलीला विवस्त्र न करता, तिच्या मर्जीशिवाय शरीराला हात लावणं म्हणजे लैंगिक शोषण नाही असा निकाल नागपूर
खंडपीठानं नुकताच दिला होता. यासंदर्भात पोक्सो कायद्यातल्या मूळ तरतुदींचा विपर्यास्त
अर्थ लावून, न्यायालयानं दिशाभूल करणारा निर्णय दिला, असं संस्थेनं म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा शहरातल्या मोंढा भागातून गुटख्याचा मोठा साठा पोलिसांनी
जप्त केला. गुटख्याची अवैध वाहतूक असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई
करण्यात आली. यावेळी पाच पोती गुटखा जप्त करण्यात आला असून, दोघांना ताब्यात घेतलं
आहे.
****
No comments:
Post a Comment