Saturday, 5 June 2021

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 05.06.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 ०५ जून २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जागतिक पर्यावरण दिवस आज साजरा होत आहे. पुनर्कल्पना, पुनर्रचना, पुनर्संचयन, ही यंदाची पर्यावरण दिनाची संकल्पना आहे. जगातल्या सर्व देशांमध्ये पर्यावरण विषयक जागृती निर्माण करण्याच्या हेतूने संयुक्त राष्ट्र संघानं १९७४ पासून या दिवसाचं आयोजन जागतिक पातळीवर केलं जात आहे. भारतात निसर्गाची पूजा करण्याची आणि निसर्गासोबत राहण्याची प्राचीन परंपरा असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाढती लोकसंख्या, वाढतं नागरीकरण, औद्योगिकीकरण, त्यासाठी होणारा पर्यावरणाचा ऱ्हास, हवा आणि जलस्रोतांचं प्रदूषण ही आजची सर्वात मोठी समस्या असून, यातून मार्ग काढण्यासाठी सर्वांनी निसर्गपूरक जीवनमानाचा अवलंब केला पाहिजे, असं उपमुख्यमंत्र्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. 

****

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषद अर्थात डीएसीच्या बैठकीत, सहा हजार आठशे कोटी रुपयांच्या साहित्य खरेदीला मंजुरी देण्यात आली. भारतीय सैन्य दलाचे आधुनिकीकरण आणि कामकाजासाठीच्या गरजा पूर्ण करण्याकरता, या खरेदीला मंजुरी देण्यात आली. प्रोजेक्ट पी 75 आय अंतर्गत, सहा स्वदेशी पाणबुड्याच्या निर्मितीच्या प्रस्तावालाही, यावेळी मान्यता देण्यात आली.

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासंबंधीची अधिसूचना राज्य सरकारनं काल जारी केली. रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि उपलब्ध ऑक्सिजन खाटा, या निकषाच्या आधारे जिल्ह्यांची पाच टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार निर्बंध कमी अधिक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, सात जून पासून राज्यभरात हे निर्बंध लागू होतील. 

****

परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथल्या श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास, काल मुंबईत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत मंजूरी देण्यात आली.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 31 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 31 May 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ت...