आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०३ ऑगस्ट २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये हॉकीच्या उपांत्यफेरीत भारतीय
पुरूष संघावर बेल्जियमनं आज सकाळी झालेल्या सामन्यात ५-२ न मात केली आणि अंतिमफेरीत
प्रवेश केला.
या रोमांचक सामन्यात भारतीय संघ २-१नं आघाडीवर होता
मात्र एलेक्सजेंडर हेंड्रिक्सच्या शानदार खेळामुळे बेल्जियमने अंतिम फेरीत धडक मारली.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाचं शानदार प्रदर्शन केल्याबद्दल
अभिनंदन केलं आहे. हार-जीत खेळाचाच एक भाग असल्याचं मोदी यांनी म्हटलं असून संघाचं
मनोधैर्य वाढवलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी ४ वाजता हा निकाल ऑनलाइन जाहीर
केला जाणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाने पत्रकाद्वारे दिली आहे.
Hscresult.mkcl.in, Mahresult.nic.in या संकेत स्थळावर हे निकाल उपलब्ध होतील आणि तिथून
त्याची प्रिंट घेता येईल.
****
देशात आतापर्यंत ४७ कोटी ८५ लाखाहून अधिक कोविड प्रतिबंधक
लसीकरण झालं आहे. गेल्या २४ तासांत देशात ६१ लाख नऊ हजाराहून अधिक लसीकरण झालं असून
कोविड संक्रमण मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ३८ शतांश टक्के झाला आहे. देशात काल ३८ हजार
८८७ रूग्ण कोविड झाले तर नव्या ४० रूग्णांची नोंद झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
ओडिशा राज्यातल्या भुवनेश्वर शहराला देशातलं १००
टक्के कोविड लसीकरण झालेल्या पहिलं शहराचा मान मिळाला आहे. याशिवाय या शहरात एक लाख
प्रवासी मजूरांनाही कोविड लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे.
****
राज्यात काल चार हजार ८७९ नवे कोविड रुग्ण आढळले,
त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६३ लाख १५ हजार ६३ झाली आहे. काल
९० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची
एकूण संख्या, एक लाख ३३ हजार ३८ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक १ दशांश टक्के झाला
आहे. काल आठ हजार ४२९ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ६१ लाख ०३ हजार ३२५ रुग्ण,
कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ६५ शतांश
टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ७५ हजार ३०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३२१ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली,
तर ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या तीन तर
बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.
****
निरोगी आयुष्य जगण्यासाठी स्वच्छ हवामान आणि अनुकुल
पर्यावरण अत्यंत आवश्यक आहे. त्यामूळे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वृक्ष लागवड हा
एकमेव पर्याय असल्याचं लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.
काल लातूर इथं ४००० वृक्षांची लागवड करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment