Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 18 January 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ जानेवारी २०२२ सायंकाळी ६.१०
****
देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना
खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात
मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित
राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा
आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय
हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.
****
·
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं
फेटाळला.
·
राज्यात ९३ नगरपंचायतीतल्या ३३६ जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातलं
मतदान शांततेत पूर्ण.
·
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी भाजपची राज्यभर निदर्शनं
·
बालहत्याकांडातल्या दोषी गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं
जन्मठेपेत रुपांतर.
आणि
·
औरंगाबाद शहरात उभारलं जाणार ४०० खाटांचं महिला - नवजात शिशु
बाल रुग्णालय.
****
माजी
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं आज फेटाळून लावला.
सक्तवसुली संचालनालय - ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी
अर्ज दाखल केला होता. शंभर कोटी रुपये वसुलीचे आरोप असलेले अनिल देशमुख सध्या मुंबईत
आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
****
राज्यात
९३ नगरपंचायतीतल्या ३३६ अनारक्षित जागांसाठी आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान शांततेत पूर्ण
झालं. इतर मागास वर्गासाठीच्या आरक्षित जागा वगळता, उर्वरित जागांसाठी गेल्या महिन्यात
पहिल्या टप्प्यात मतदान झालेलं आहे. दोन टप्प्यातल्या या मतदानाची मतमोजणी उद्या होणार
आहे
उस्मानाबाद
जिल्ह्याच्या वाशी नगरपंचायतीच्या चार जागांसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६८% मतदान
झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
नाना पटोले यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यात नाशिक, वाशिम, अमरावती,
बुलडाणा, सोलापूरसह अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. उस्मानाबाद इथं पटोले यांच्या
प्रतिमेला जोडे मारा आंदोलन करण्यात आलं.
भाजपचे
प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पटोले यांच्याविरोधात गुन्हा
दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात
खुलासा करताना, पटोले यांनी, आपण पंतप्रधानांबद्दल बोललेलो नसून, आपल्या मतदारसंघातल्या
एका गुंडाबद्दल बोललो’ असं म्हटलं आहे. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी
एक पत्रक प्रसिद्ध करून, ‘नाना पटोलेनी त्या गावगुंडाची छायाचित्रासह संपूर्ण माहिती
प्रसिद्ध करावी, असं आव्हान दिलं आहे.
****
महाराष्ट्रातील
वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय रुग्णालय समुदायानं महाराष्ट्राला
सहकार्य करावं, असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. राज्यातल्या
वैद्यकीय सुविधा तसंच आरोग्य व्यवस्थेसंदर्भात आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत देशमुख
बोलत होते. राज्यात सुपरस्पेशालिटी रुग्णालयं, चांगल्या वैद्यकीय सेवा-सुविधांचे जाळे
विकसित करणं आणि या सेवा सर्वसामान्यांना किफायतशीर दरात उपलब्ध करणं यावर राज्य शासनाचा
भर आहे. यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
राज्यभरात
गाजलेल्या बालहत्याकांडातल्या दोषी गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत
झालं आहे. या भगिनींच्या दया याचिकेवर सरकारनं लवकर निर्णय न घेतल्यानं त्यांची शिक्षा
जन्मठेपेत रुपांतरित केल्यांचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. १३ मुलांचं अपहरण
आणि त्यातल्या नऊ जणांची हत्या केल्याच्या आरोपावरुन त्यांना २१ वर्षांपूर्वी २००१
मध्ये उच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली होती. सर्वोच्च न्यायालयातही हा निर्णय
कायम झाल्यामुळे, सुमारे ८ वर्षांपूर्वी या भगिनींनी दयेचा अर्ज केला होता. यावर अजूनही
निर्णय न दिल्यानं शिक्षा बदलण्यात आल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
मराठी
भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी भाषा विभागाच्यावतीनं तयार करण्यात आलेला ‘शांतता,
मराठीचं कोर्ट चालू आहे’, हा लघुपट आजपासून मंत्रालय परिसरात दाखवण्यात येत आहे. याच
ठिकाणी अभिजात मराठीची महती सांगणारं प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. मराठी भाषा मंत्री
सुभाष देसाई यांच्या हस्ते या दालनाचं आज उद्घाटन करण्यात आलं. आजपासून मंत्रालय परिसरातील
अधिकारी आणि अभ्यागतांना हा लघुपट आणि प्रदर्शन पाहता येणार आहे.
****
६१
व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन कलाकृती स्वीकारण्यास कला संचालनालयामार्फत
२५ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रदर्शनात चित्रकला, शिल्पकला, उपयोजित
कला, मुद्राचित्रण आणि दिव्यांग या विभागासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या कलावंतांकडून
कलाकृती मागवण्यात येत आहेत. यासाठी संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात
आपल्या कलाकृती सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यापूर्वी ही मुदत १५ जानेवारी
पर्यंत होती.
****
शेतकरी
कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या पार्थिव देहावर आज कोल्हापुरात
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी कोविडचे नियम असल्यानं
कांही निवडक लोक यावेळी उपस्थित होते.
****
औरंगाबाद
शहरात शासकीय दूध डेअरीच्या जागेवर आता २०० ऐवजी ४०० खाटांचे महिला आणि नवजात शिशु
बाल रुग्णालय उभारण्यात येणार आहे, खासदार इम्तियाज जलील यांनी आज या रुग्णालय बांधकामाची
पाहणी केल्यानंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. यासाठी १११ कोटी रुपयांचा निधीही
मंजूर झाला असल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं. येत्या दोन वर्षात या रुग्णालयाचं
काम पूर्ण होणार असून औरंगाबाद जिल्ह्याव्यतिरिक्त मराठवाड्याच्या जनतेला या रुग्णालयाचा
लाभ होणार असल्याचं खासदार जलील म्हणाले.
****
हिंगोली
जिल्ह्यात उगम ग्रामीण विकास संस्थेच्या सचिव छाया पडघन यांना पुण्यातल्या युवा फाउंडेशनचा
‘युवा जोश पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. कळमनुरी तालुक्यात उमरा इथं ग्रामीण
भागातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसंच जनजागृतीसाठी छाया पडघन या गेल्या अनेक वर्षांपासून
कार्यरत आहेत.
****
जालना
जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना २०२१ नुसार जिल्ह्यातल्या एक लाख ८८ हजार ८२९ शेतकऱ्यांना
१०८ कोटी ८६ लाख रुपयांची पीकविमा नुकसान भरपाई देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.
विजय राठोड यांनी आज ही माहिती दिली. पीकविमा काढलेल्या ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीची
पूर्वसचूना ७२ तासांच्या आत दिलेली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी सरासरी उत्पन्नाच्या आधारे
विमा नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही तक्रार करण्याची
आवश्यकता नाही, असं जिल्हाधिकारी राठोड यांनी सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment