Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 May 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ मे २०२२ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त
राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या प्रगतीत या राज्यानं अभूतपूर्व
योगदान दिलं असून या राज्यातील जनतेनं विविध क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं असल्याचं
पंतप्रधानांना आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी
आपण प्रार्थना करत असल्याचं त्यांना म्हटलं आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत हुतात्मा
चौकातील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आज सकाळी अभिवादन केलं. यावेळी पर्यटन मंत्री
तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.
****
राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतल्या छत्रपती शिवाजी
महाराज मैदानात मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल
कोश्यारी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,
श्रीमती रश्मी ठाकरे, मुंबई जिल्ह्याचे पालकमंत्री असलम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे
पालकमंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी कोविड काळ असूनही राज्यानं प्रगती आणि विकास कार्यात कुठेही खंड पडू
दिला नसल्याचं सांगितलं. देशातलं एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेलं पहिलं राज्य
होण्यासाठी महाराष्ट्रानं विकासाची पंचसूत्री ठरवली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी
काढले.
****
नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात
आला. निवासी आयुक्त डॉ.निरूपमा डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
औरंगाबादमध्ये पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजोरोहण झालं.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांच्या हस्ते
ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी सर्व शैक्षणिक आणि प्रशासकीय विभागप्रमुख, प्राध्यापक,
अधिकारी, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
परभणीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
यावेळी मुंडे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी योगदान दिलेल्या सर्व ज्ञात
अज्ञात वीरांना अभिवादन केलं. जिल्हा प्रशासनाच्या ‘करू या जागर श्रमाचा’ या घोषवाक्याचं
आणि परभणी जिल्हा गौरव गीताचं अनावरण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात
आलं.
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती प्रसिद्धी दालनाचं उद्घाटनही
त्यांनी याप्रसंगी केल. या दालनातून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती
देणारी भित्ती पत्रकं, घडी पत्रिका, बॅनर्स आदी ग्रामीण भागात उपलब्ध करून विभागाच्या
योजनांची माहिती देण्यात आली आहेत.
****
लातूरमध्ये पालकमंत्री अमित देशमुख यांनी ध्वचारोहण केलं. कोविड काळात
आणि कोविड नंतर जिल्ह्यात पायाभूत सोयी सुविधा आणि लोक कल्याणकारी योजनांची मोठ्या
प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचं
त्यांनी ध्वजारोहणानंतर जिल्ह्यातील नागरिकांना उद्देशून शुभेच्छा संदेश देताना सांगितलं.
यापुढेही सर्वांच्या सहकार्यानं लातूर जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देऊ असं देशमुख
म्हणाले. जिल्ह्यातील लसीकरणाला गती देण्याची आवश्यकता सांगून कोविडच्या चौथ्या लाटेची
शक्यता वर्तवली जात असल्यामुळे सर्वांनी सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
बीडमध्ये राज्याचे पर्यावरण, तसंच संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे
यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. कोविडच्या चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन साथ नियंत्रणात
ठेवण्यासाठी शासन आवश्यक सर्व उपाययोजना करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी
पोलिस दलाच्या वतीनं राज्यमंत्री बनसोडे यांना मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी
राधाबिनोद शर्मा, मुख्य कार्यकारी आधिकारी अजित पवार, यावेळी उपस्थित होते.
****
देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १८९ कोटी मात्रांचा टप्पा
पार केला आहे. काल दिवसभरात २३ लाख नागरीकांचं लसीकरण झालं. १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या
३ कोटी ६३ लाखांहून अधिक मुलांचं लसीकरण आतापर्यंत करण्यात आलं आहे. १८ वर्षांहून अधिक
वय असलेल्या २ कोटी ८२ लाखांहून अधिक आरोग्य कर्मचारी तसंच आघाडीच्या कर्मचाऱ्यांनी
वर्धक मात्रा देण्यात आली आहे.
आतापर्यंत देशभरात या लसीच्या १८९ कोटी १७ लाखांहून अधिक मात्रा देण्यात
आल्या आहेत. गेल्या २४ तासात २५ लाख ९५ हजारांहून अधिक नागरिकांचं लसीकरण झालं.
****
No comments:
Post a Comment