Saturday, 24 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.09.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

तांदूळाच्या अतिरिक्त साठ्यामुळे त्याची देशांतर्गत किंमत आंतरराष्‍ट्रीय बाजार आणि शेजारील देशांच्‍या तुलनेत आटोक्‍यात राहील, असं सरकारनं म्हटलं आहे. गेल्या वर्षी धानाच्या किमान आधारभूत किंमतीत पाच पूर्णांक १५ शतांश टक्के वाढ झाली असल्याचं, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं.

****

भारतानं गेल्या काही वर्षांत बालमृत्यू दर कमी करण्यात लक्षणीय कामगिरी केल्याचं याबाबतच्या अहवालात म्हटलं आहे. नमुना नोंदणी प्रणाली सांख्यिकी अहवाल २०२० नुसार, २०१४ साला पासून देशात बालमृत्यू दर, नवजात बालक मृत्यू दर आणि पाच वर्षां खालच्या बालकांच्या मृत्यू दरात सातत्यानं घट होताना दिसत आहे.

****

केंद्र सरकारच्या अनेक लोकोपयोगी योजना राज्यांमार्फत चालवल्या जातात, या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचं, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटलं आहे. ते काल चंद्रपूर इथं बोलत होते. वाढतं प्रदूषण ही चिंतेची बाब असून, प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं हरित योजना आणल्या असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. 

****

राष्ट्रीय तपास संस्था आणि सक्तवसुली संचालनालयानं गुरुवारी टाकलेले देशव्यापी छापे तसंच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआयच्या नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ, केरळमध्ये पीएफआयनं पुकारलेल्या बंदमुळे काल सामान्य जनजीवन प्रभावित झालं हातं. निदर्शनात दगडफेकीमुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं, तसंच काही नागरिकही जखमी झाले. बंद पुकारणाऱ्या पीएफआय नेत्यांविरोधात केरळ उच्च न्यायालयानं स्वत:हून कारवाई केली.

****

मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला मुंबईत शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. याप्रकरणी काल झालेल्या सुनावणीत न्यायालयाने, मुंबई महानगरपालिकेनं आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचं निरीक्षणही नोंदवलं आहे.

****

राज्यात महिनाभरात सार्वत्रिक निवडणुका घेऊन दाखवण्याचं आव्हान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे, ते भाजपानं स्वीकारावं, असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक जिल्ह्यात मनमाड इथं बातमीदारांशी बोलत होते.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...