Friday, 30 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.09.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत आरबीआचं पतधोरण जाहीर केलं. रेपो दरात ५० बीपीएस पॉईंट म्हणजे अर्ध्या टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

****

गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. तसंच गांधीनगर ते कालूपूर या स्थानाकांदरम्यान ते या गाडीतून प्रवासही करत आहेत.

दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते आज अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन होणार आहे.

****

राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत, ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं  वितरण होणार आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतल्या अतुलनीय योगदानाबद्दल अभिनेत्री आशा पारेख यांना २०२० साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मराठी चित्रपट ‘फ्यूनरल ला गौरवण्यात येणार आहे.

****

राज्य सरकारनं काल ४४ सनदी अधिकार्यांच्या बदल्या केल्या. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी विकास मीना यांची, तर जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वर्षा मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

पंढरपूरमधल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना शासनानं पदावरून दूर केलं आहे. गुरव यांनी केवळ तोंडी आदेशाद्वारे श्री विठ्ठल मंदिरातल्या भजन-कीर्तनावर बंदी घातली होती. हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायानं या संदर्भात केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

****

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला टेनिस संघानं दिल्लीवर दोन - शून्य असा सहज विजय मिळवला. अन्य सामन्यांत महाराष्ट्राच्या रुद्रांश पाटील आणि आर्या बोरसेनं १० मीटर एअर रायफलमध्ये अंतिम फेरीतला प्रवेश निश्चित केला.

****

भारताच्या एन सिक्की रेड्डी आणि रोहन कपूर यांनी हाँग कोंग च्या खेळाडूंचा पराभव करत, व्हिएतनाम खुल्या सुपर हंड्रेड बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

****

No comments: