आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ सप्टेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे.यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.या शुभप्रसंगी सर्वांचं
जिवन ऊर्जा आणि आनंदानं भरावं असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
***
९६ वावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या फेब्रुवारी महिन्यात वर्धा इथं
होणार आहे. आयोजनाबाबत झालेल्या बैठकीत संमेलनाची पूर्वतयारी आणि आगामी आयोजनाबाबत
माहिती देण्यात आली.५३ वर्षांनंतर वर्धा इथं हे संमेलन होणार आहे.
***
औरंगाबाद शहरातील नऊ हजार फेरीवाल्यांना प्रत्येकी १० हजार रुपये स्वनिधी देण्यात
आल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली. ते काल औरंगाबाद
इथं आढावा बैठकीत बोलत होते. ही योजना अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासंबंधी त्यांनी
संबंधितांना निर्देश दिले.
***
औरंगाबाद शहराचं ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा इथं तुळजा भवानी देवीच्या मंदिरात
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापना आणि महापूजा
करण्यात आली.मंदिर परिसरात नऊ दिवसात जागरण गोंधळ तसंच विविध कार्यक्रम होणार आहे.
***
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर इथल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात
सकाळी साडेआठ वाजता मानाच्या तोफेची सलामी झाल्यानंतर घटस्थापना करण्यात आली.आज पहाटेपासून
देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
घटस्थापनेनिमित्त सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शासकीय
सुटी जाहीर केली आहे.
***
जनावरांमध्ये होत असलेल्या लंपी आजारामुळं नांदेड जिल्ह्यात ८७ पशुधन बाधित झाले
आहेत. आता पर्यंत ८४ हजार ९६८ पशुधनाचं लम्पी लसीकरण पूर्ण झाले आहे.
***
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना जिंकत भारतानं
२-१ च्या फरकानं मालिका जिंकली आहे.
***
No comments:
Post a Comment