Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28 September 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८
सप्टेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशविघातक
कृत्य करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांचे मनसुबे
यशस्वी होणार नाहीत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक
इथं वार्ताहरांशी बोलत होते. दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत तसंच अन्य बेकायदेशीर
कारवाया केल्याप्रकरणी पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआय या संघटनेवर केंद्र
सरकारनं पाच वर्षाची बंदी घातल्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं आहे
.
राज्यात,
देशात कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं खपवून घेतलं जाणार
नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचं ते
म्हणाले. केंद्राचा आणि राज्याचा गृहविभाग दोघांचंही यावर बारीक लक्ष असून, देशात
राष्ट्रद्रोही, देशद्रोही विचार कुणालाही पसरवता येणार नाही आणि पसरवू दिले जाणार
नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
भारतरत्न
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज जन्मदिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट
संदेशाद्वारे लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला असून, त्यांना आदरांजली वाहिली
आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लतादीदींना अभिवादन केलं आहे.
दरम्यान,
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचं उद्घाटन आज
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मुंबईत प्रभादेवी इथं रविंद्र नाट्य मंदिरात
पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये हे महाविद्यालय सुरु होत आहे.
उत्तर
प्रदेशात अयोध्या इथं लता मंगेशकर चौकाचं उद्घाटन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
यांच्या हस्ते झालं. अयोध्यामधल्या प्रसिद्ध न्याय घाट चौकाचं नामकरण लता मंगेशकर
चौक करण्याचं मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी जाहीर केलं होतं. केंद्रीय सांस्कृतिक
मंत्री जी किशन रेड्डी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल
जवळपास १४ लाख नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २१७ कोटी ९६
लाख ३१ हजार ५०० मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
देशात काल नव्या तीन हजार ६१५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर चार
हजार ९७२ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ४० हजार ९७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पीएचडी
करणाऱ्या उमेदवारांना फेलोशीप मिळाल्यापासून पहिल्या दोन वर्षासाठी ३१ हजार रुपये,
अधिक घर भाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च, तर पुढच्या तीन वर्षासाठी रुपये ३५ हजार
अधिक घर भाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च मिळणार आहे. महाज्योती अर्थात महात्मा
ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या नागपूर इथं झालेल्या संचालक
मंडळाच्या बैठकीत हा ठराव मंजूर झाला. पीएचडी सोबतच एम. फिल. उमेदवारांना एमफिल ते
पीएचडी असा एकत्रित लाभ मिळेल. युपीएससी साठी नवी दिल्ली इथं पूर्वतयारी करणाऱ्या
उमेदवारांना मासिक विद्या वेतन १० हजारावरून १३ हजार, तर आकस्मिक खर्च एक वेळा १८
हजार रुपये केला आहे. उमेदवारांना २५ हजार रुपयांचं एक वेळ अर्थसाह्य मिळणार आहे.
व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या २० उमेदवारांना दरमहा दहा हजार
रुपये विद्या वेतन देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
****
पर्यटन
हा जगातला सर्वात मोठा व्यवसाय असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या एकूण उत्पन्नामध्ये
नऊ टक्के वाटा पर्यटनाचा आहे, तो वाढवायचा असेल तर, जनसामान्यांमध्ये पर्यटनाबाबत
जागृती निर्माण करणं आवश्यक असल्याचं, भारतीय पुरातत्व खात्याचे औरंगाबाद
परिमंडळाचे अधीक्षक डॉक्टर मीलनकुमार चावले यांनी म्हटलं आहे. जागतिक पर्यटन
दिनानिमित्त्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या, इतिहास आणि
प्राचीन भारतीय संस्कृती विभागानं आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात, ते काल बोलत
होते. अजिंठा आणि पितळखोरा लेण्यंमध्ये रोप -वे करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला
सादर केला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
हिंगोली
जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह पहायला मिळत आहे. यावर्षी शहरी भागात १४६ तर
ग्रामीण भागात ५८१ मंडळांद्वारे दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली असून, विविध
कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आलं आहे. पर्यावरण, आरोग्यविषयक प्रबोधन करणारी
दृश्ये, आकर्षक रोषणाई, स्वागतद्वार आदीं सजावटींनी परिसर नटला आहे. त्यामुळे
भाविकांची ही वर्दळ वाढली आहे.
****
भारत
आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरवात होत
आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज तिरुवनंतपुरम इथं खेळला जाणार
आहे. संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मालिकेनंतर दोन्ही संघात
तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment