आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ सप्टेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय लष्कराने पाक - व्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर सर्जिकल
स्ट्राईक केल्याच्या घटनेला आज सहा वर्षं पूर्ण झाली.
२०१६ मध्ये आजच्याच दिवशी ही लष्करी कारवाई करण्यात
आली होती. उरी हल्ल्यामध्ये १८ भारतीय सैनिक हुतात्मा झाल्याच्या ११ दिवसांनंतर, भारतीय
सैन्यानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठ्या संख्येनं दशतवाद्यांना
ठार करण्यात आलं.
****
भारतरत्न
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज जन्मदिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशाद्वारे
लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला असून, त्यांना आदरांजली वाहिली आहे.
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. मुंबईत
प्रभादेवी इथं रविंद्र नाट्य मंदिरात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या
अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
****
ग्रामीण विकास मंत्रालयानं विकसित केलेल्या, देशभरातल्या
खेडेगावांतल्या विहिरींच्या पाणीपातळीची माहिती देणार्या 'जलदूत'
या ॲपचं लोकार्पण, काल नवी दिल्लीत राज्यमंत्री
कपिल पाटील यांच्या हस्ते झालं. या ॲपद्वारे देशभरातल्या विहिरींची,
मान्सूनपूर्व आणि मान्सून पश्चात, अशी वर्षातून
दोनदा पाणीपातळी मोजता येईल.
****
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कारात महाराष्ट्राचा
दुसरा क्रमांक आला आहे. काल नवी दिल्लीत २०१८-१९ चे पुरस्कार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
****
महान क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा भगतसिंग यांची जयंती आज विविध कार्यक्रमांनी
साजरी केली जाणार आहे. यानिमित्त डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शहीद भगतसिंग अध्यासन केंद्रात, सामाजिक कार्यकर्ते विधिज्ञ अभय टाकसाळ यांचं, ‘शहीद
भगतसिंग यांचा सामाजिक दृष्टीकोन’, या विषयावर व्याख्यान होणार
आहे.
****
अहमदाबाद इथं सुरु असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या
महिला कबड्डी संघानं काल यजमान गुजरात संघावर ४६-२२ अशा गुणफरकानं
विजय मिळवला. महाराष्ट्राच्या संघानं सलग दुसऱ्या सामन्यात विजयाची नोंद केली.
****
No comments:
Post a Comment