Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ ऑक्टोबर
२०२२ दुपारी १.०० वा.
****
सध्या सुरू असलेल्या विशेष स्वच्छता मोहिम टू पॉईंट ओ
नं लक्षणीय प्रगती साधली असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. दोन ऑक्टोबरला सुरू झालेल्या
या विशेष मोहीमेत, स्वच्छता तसंच सरकारी कार्यालयांमधली प्रलंबितता कमी करण्यावर भर देण्यात आला. मोहिमेच्या तिसर्या आठवड्यापर्यंत मिळालेल्या प्रगतीबद्दल आकाशवाणीशी बोलताना केंद्रीय कार्मिक,
सार्वजनिक तक्रारी राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. भंगाराच्या विल्हेवाट लावण्यातून २५४ कोटी
रुपयांहून अधिक कमाई झाली असून, ३७ लाख चौरस फुटांपेक्षा जास्त
डंप आणि जंक वस्तूंनी व्यापलेली जागा मोकळी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. या मोहिमेअंतर्गत तीन लाखांहून अधिक सार्वजनिक तक्रारींचं निवारण करण्यात आलं असून, ५८८ नियम सुलभ करण्यात आले
आहेत, असंही जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.
****
काँग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज नवी दिल्ली इथं आपला पदभार
स्विकारला. नेहरु-गांधी घराण्याशी संबंधित नसलेले खरगे गेल्या २४
वर्षातले पहिलेच काँग्रेस अध्यक्ष ठरले आहेत.
****
बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा आज साजरा होत आहे. विक्रम संवतचा हा पहिला दिवस साडेतीन मुहूर्तपैकी अर्धा
मुहूर्त मानला जातो. विक्रम संवत २०७९ आज सुरु होत आहे. व्यापारी वर्गाचं नवं वर्ष आजपासून सुरू होतं.
बहीण भावाच्या नात्याचा स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सणही आज साजरा होत
आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या
आहेत. यानिमित्त त्यांनी महिलांप्रती आदर आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं
आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक
लसीकरण मोहिमेनं २१९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल जवळपास
९६ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत २१९ कोटी ५७
लाख ६५ हजार ५९८ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या ८३० कोरोना
विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर एक हजार ७७१ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २१ हजार ६०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात
या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा
हा ९४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
****
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पर्यटन विकास महामंडळाच्या राज्यातल्या तीस रिसॉर्ट्स
आणि हॉटेल्सचं शंभर टक्के आरक्षण झालं आहे. त्यामुळे आता पर्यटकांना सुट्टीचा आणि थंडीचा
आनंद घेता येणार आहे, अशी माहिती, एम टी डी
सी चे प्रादेशिक संचालक दीपक हरणे यांनी दिली. पर्यटक केद्रस्थानी ठेवून अतिथी देवो
भव या नात्यानं पर्यटकांना सर्वोत्तम सुविधा दिल्यानं, महामंडळास
पर्यटकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. नवीन सुविधा, ज्येष्ठ
नागरिक, शासकीय कर्मचारी, आजी आणि माजी
सैनिक यांच्यासाठी सवलती, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग यामुळे पर्यटकांचा दीपावलीचा आनंद द्विगुणित होत आहे, असंही
हरणे यांनी सांगितलं. तसंच पर्यटकांनीही पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा जपत पर्यटनाचा
आनंद द्विगुणित करावा, असं आवाहन त्यांनी केलं.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२३ मध्ये घेण्यात
येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात
आलं आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची
आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी दिली. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ
स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा, नागरी सेवा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासह
अभियांत्रिकी, कृषी सेवा, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा आदी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
****
वाशिम जिल्ह्यातल्या उंबर्डा इथं दिवाळीच्या
दुसऱ्या दिवशी गोवर्धनपुजा निमित्त गायींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. शेकडो
वर्षांची ही परंपरा आजही तितक्यां उत्साहात साजरी केली जाते. हा विलोभनीय
सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
****
फ्रेंच ओपन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या सायना
नेहवालला जर्मनीच्या यवोनी ली कडून २१- १३, १७ - २१, १९ - २१ असा पराभव पत्करावा लागला.
मिश्र दुहेरीतही भारताच्या इशान भटनागर आणि तनीषा
क्रॅस्टो या जोडीचा पराभव झाला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि
चिराग शेट्टी यांच्या जोडीनं फ्रान्सच्या जोडीचा पराभव केला.
****
ऑस्ट्रेलियात
सुरु असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा दुसरा सामना उद्या आलर्यंड
सोबत होणार आहे. दुपारी साडे बारा वाजता सामन्याला सुरुवात होईल.
दरम्यान,
या स्पर्धेत आज इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात सामना सुरु आहे, तर दुपारी दीड वाजता
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना सुरु होणार आहे.
****
No comments:
Post a Comment