Monday, 31 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.10.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्त आज देशभरात राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे.

नवी दिल्लीत पटेल चौक इथल्या स्मारकाला भेट देऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये केवाडिया मधल्या 'स्टॅचू ऑफ युनिटी' इथं सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली. केवाडिया इथं आयोजित एकता दौड संचलनात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना एकतेची शपथ दिली. गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत 'एकता दौड'ला रवाना केलं. राज्यातही धुळे, नंदुरबार, वाशिम इथं एकता दौड निघाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.

****

गुजरातमध्ये मोरबी इथल्या मच्छू नदीवरचा झुलता पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १४० वर पोहोचली आहे. सुमारे १७० जणांना वाचवण्यात यश आलं आहे. हा पूल नुतनीकरणानंतर पाचच दिवसांपूर्वी नागरीकांसाठी खुला करण्यात आला होता. या दुर्घटनेमागच्या कारणांची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारनं पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

****

भारतीय विद्यार्थ्यांना फूटबॉल या खेळाचं शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळावं, यासाठी फिफा फेडरेशनच्या फिफा फूटबॉल फॉर स्कूल या प्रकल्पांतर्गत, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं काल फिफा सोबत करार करण्यात आला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि फिफा चे अध्यक्ष जियानी इन्फॅन्टीनो यांनी नवी मुंबईत या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

****

फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीचं अजिंक्यप पटकावलं आहे. पॅरिस इथं झालेल्या अंतिम सामन्यात या जोडीनं चायनीज तैपेईच्या जोडीचा २१ - १३, २१ - १९ असा पराभव केला.

****

१७ वर्षाखालच्या महिलांच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद स्पनेनं पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम लढतीत स्पनेनं कोलंबियाचा एक - शून्य असा पराभव केला.

****

.

No comments:

Text-آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 14 اگست 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 14 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...