आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ ऑक्टोबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी म्हटलं आहे. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील धोडराज इथं पोलीस मदत केंद्राच्या
प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर काल
ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनजागरण मेळाव्यास संबोधीत केलं तसंच
आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
नक्षलग्रस्त भागात जाऊन पोलिसांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्यासोबत दिवाळी
साजरी करणं हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
***
अमेरिकेच्या जगप्रसिद्ध फोर्ब्स मँगझिननं दखल घेतलेला, अनेक राष्टीय आणि आंतरराष्ट्रीय
चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त झालेल्या ''पल्याड'' या मराठी चित्रपटाची महाराष्ट्राच्या
सांस्कृतिक मंत्रालयानं निवड केलेल्या पाच चित्रपटामध्ये निवड झाली आहे. गोव्यात होणाऱ्या
५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात फिल्म बाजारमध्ये चित्रपटाची निवड करण्यात
आली आहे अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. तसंच स्पेनमध्ये
कँलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कमी बजेटमध्ये तयार केलेल्या चित्रपटासाठी
दिग्दर्शक शैलेश भीमराव दुपारे यांना बेस्ट दिग्दर्शकच्या अवार्ड जाहीर झालेला आहे.
या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण चंद्रपुर जिल्हयात झालेलं आहे .
***
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात सुमारे दोन हजार रुपयांची वाढ प्रस्तावित आहे. अंगणवाडी
सेविकांना दिवाळीत भाऊबीज म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. त्यांचं मानधन
वाढवून कायमचा दिलासा देण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात
आला आहे. काही दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचं, याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
***
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२३ या वर्षांत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा
परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर
उपलब्ध असल्याची माहिती आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी दिली आहे.
***
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी टि्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि
नेदरलंड संघात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेबारा वाजता सामना
होईल. दुपारी १२ वाजेपासून या सामन्याचं धावतं समालोचन आकाशवाणीवरुन ऐकता येणार आहे.
***
संक्षिप्त बातमीपत्र संपलं, आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद
AURANGABAD AIR NEWS या यू- ट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता
No comments:
Post a Comment