Friday, 3 March 2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.03.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०३ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज होणार आहे. भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत असून, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत भारत - प्रशांत क्षेत्रातली घटना आणि परस्पर हिताचे क्षेत्रीय मुद्दे, तसंच मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत दृष्टीकोनाविषयी मतांची देवाणघेवाण होणार आहे.

***

दरम्यान, जी-20  देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची औपचारिक बैठक कालपासून नवी दिल्ली सुरु झाली. कोविड महामारी, पुरवठा साखळीतले अडथळे, हवामान बदलाची आव्हानं एकजुटीनेच पेलायची आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यावेळी म्हणाले.

***

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला २०२३ या वर्षीचा पोर्टर पुरस्कार मिळाला आहे. कोविड १९ साथीचं व्यवस्यथापन धोरण, तसंच विविध संबंधितांचा विशेषत: पीपीई किट तयार करण्यात आशा कर्मचाऱ्यांचा सहभाग यासाठी मंत्रालयाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठात द इंडिया डायलॉग दरम्यान या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. 

***

नवी दिल्लीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स च्या गतिशक्तीवरच्या राष्ट्रीय परिषदेत काल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी संबोधित केलं. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखडा आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरणाची एकत्रित अंमलबजावणी, उद्योग आणि सर्वसामान्य जनता अशा दोघांनाही लाभदायक ठरेल, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

***

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या केमवाडी सज्जा इथल्या तलाठ्याला दहा हजार रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. रविंद्र दत्तात्रय अंदाने असं या तलाठ्याचं नाव आहे. त्यानं तक्रारदारकडे शेत जमिनीची संमती पत्राप्रमाणे पत्नी आणि मुलाच्या नावे खातेफोड नोंद करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती.

***

बॉर्डर - गावसकर मालिकेतल्या इंदूर इथं झालेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा नऊ गडी राखून पराभव केला. दुसऱ्या डावात विजयासाठी असलेलं ७६ धावांचं लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघाने आज सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी एक गडी गमावत पूर्ण केलं.

 

//************//

No comments: