आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ मे २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
देशातल्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस
विक्रांतवर पहिल्यांदाच लढाऊ विमान मिग - 29 के
च्या नाईट लँडिंगची अर्थात रात्रीच्या वेळी उतरण्याची यशस्वी चाचणी काल पूर्ण झाली. संरक्षण मंत्री राजनाथ
सिंह यांनी या यशाबद्दल नौसेनेचं अभिनंदन केलं आहे. ही चाचणी म्हणजे भारतीय नौसेनेचं
आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं महत्वपूर्ण पाऊल असल्याचं नौसेनेनं म्हटलं आहे.
***
जागतिक शाश्वत विकासाच्या निर्धारित ध्येयपूर्ती वर्षाच्या अगोदरच पाच वर्ष म्हणजेच
२०२५ पर्यंत भारतातून क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी शासन प्रयत्नशील
असल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी
दिली. जिनिव्हा इथं सुरू असलेल्या ७६ व्या जागतिक आरोग्य परिषदेमध्ये क्षयरोगावर
आधारित क्वाड प्लस साईड इव्हेंट मध्ये ते काल बोलत होते.
जगात केवळ भारतानं क्षयरोगाचा धोका जाणून घेण्यासाठी स्वतःची यंत्रणा तयार केली आणि
त्यामुळेच आपल्याला क्षयरोगाच्या रुग्णांमध्ये १३ टक्के घट करण्यात यश मिळाल्याचं
त्यांनी सांगितलं.
***
आपत्ती जोखीम कमी करण्यासंदर्भातील जी - 20 कृतिगटाच्या
बैठकीचा काल मुंबईत समारोप झाला. आपत्ती घडण्याआधी सावधानतेचा
इशारा आणि आगाऊ कार्यवाही करण्यासाठी आर्थिक मदत कशी करता येईल, याविषयीच्या तांत्रिक बाबींवर यामध्ये चर्चा झाली.
***
गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे
यांना न्यायाशीधांना धमकावल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. चामोर्शी कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान माजी सभापती अतुल पवार यांना मारहाण केल्याप्रकरणी
खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एन डी मेश्राम
यांनी दिले होते. त्यावरुन खांडवे यांनी न्यायाधीशांच्या
बंगल्यावर जाऊन त्यांना शिवीगाळ करून हुज्जत घातली होती. न्यायाधीशांच्या
तक्रारीनंतर खांडवे यांना निलंबित करण्यात आल्याचं पोलिस अधिक्षकांनी सांगितलं.
***
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या अब्दुल्लापूर
तांडा या गावानं हातभट्टी दारु कायम स्वरुपी बंद करण्याचा निर्णय
घेतला आहे. गावाच्या ग्रामसभेत या संदर्भातला ठराव काल घेण्यात आला.
No comments:
Post a Comment