आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ मे २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था - इस्त्रोनं, एन व्ही एस. वन या दिशादर्शक उपग्रहाचं आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपण
केलं. काही वेळापूर्वी दहा वाजून ४२ मिनिटांनी जीएसएलव्ही एफ १२ या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अवकाशात झेपावला. या उपग्रहासोबत पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीचं आण्विक घड्याळ वापरलं गेलं.
या प्रक्षेपणानंतर भारत तीन अन्य देशांच्या यादीत दाखल झाला आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्लीत भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची
बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा उपस्थित होते. विकासाला गती देऊन नागरिकांचं कल्याण सुनिश्चित करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं पंतप्रधानांनी ट्विट
संदेशात म्हटलं आहे.
***
मणीपूरमध्ये काल सुरक्षा दलाससोबत झालेल्या
चकमकीत ४० संशयित कूकी दहशतवादी मारले गेले. सुगनू विधानसभा क्षेत्रात
झालेल्या या चकमकीत सात नागरिक आणि दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू
झाला.
***
सीमा सुरक्षा दलानं पंजाबमध्ये भारत - पाकिस्तान सीमेजवळ काल एक ड्रोन पाडलं. या ड्रोनद्वारे तीन किलोहून अधिक वजनाचे अंमली पदार्थ भारतात चोरून आणायचा
प्रयत्न करणाऱ्या एका तस्करालाही बी एस एफनं अटक केली आहे. या ड्रोनमध्ये हेरॉईन या
अंमली पदार्थाची तीन पाकिटं होती, असं दलाचे
महासंचालक संजय गौर यांनी सांगितलं.
***
मुंबई इथं देखील अंमली पदार्थ विरोधी पोलिस पथकानं मेथामफेटामाईन
या अंमली पदार्थासह एका नायजेरीयाच्या व्यक्तीला काल अटक केली.
त्याच्याकडून २२ लाख रुपये किंमतीचे ११०
ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आलं. माहीम रेल्वे
स्थानकावर ताब्यात घेऊन या संशयिताची पंचांसमोर झडती घेतली असता
त्याच्याकडे अंमली पदार्थ आढळून आले.
***
ओमानमध्ये सालाह इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ गटाच्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं काल थायलंडच्या संघावर १७ गोल्स करत विजय मिळवला. थायलंडचा संघ एकही गोल करू शकला नाही. या विजयामुळे
भारतीय संघानं अ गटातला एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
//************//
No comments:
Post a Comment