Wednesday, 20 September 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 20.09.2023 रोजीचे सकाळी : 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

महिलांना लोकसभा, राज्यांमधल्या विधानसभा आणि दिल्ली विधानसभेमध्ये एक तृतियांश आरक्षणाची तरतूद असणारं विधेयक, आज लोकसभेत चर्चेसाठी येणार आहे. नवीन संसद भवनातल्या कामकाजाच्या पहिल्या दिवशी काल केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी, १२८ व्या दुरुस्तीचं हे नारी शक्ती वंदन विधेयक सादर केलं.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आज नवी दिल्लीत आशिया प्रशांत क्षेत्राच्या मानवाधिकार संस्थांच्या परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. मानवाधिकाराच्या सार्वभौम घोषणेचा ७५ वा वर्धापनदिन आणि राष्ट्रीय मानवाधिकार संस्था आणि पॅरिस नियमांना ३० वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं या दोन दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यावरण आणि हवामान बदलाच्या मुद्यांवर देखील या परिषदेत विचारमंथन होणार आहे.

****

खेळाडूंच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारकडून पंडीत दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय योजना राबवली जात असून, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी काल या योजनेअंतर्गत काही खेळाडूंना मदतनिधीचं वितरण केलं. अतिशय गरीब परिस्थिती असलेल्या प्रतिभावान खेळाडूंना मदत करण्यासाठी ही योजना राबवली जात असल्याचं, ठाकूर यांनी सांगितलं. आतापर्यंत २७० खेळाडूंना सुमारे ८ कोटी १५ लाख रुपयांची मदत दिली असल्याची माहिती त्यांनी दिली.

****

शेतक-यांचं कल्याण केंद्रस्थानी ठेवून कृषी कर्ज आणि पीक विम्यावर केंद्रीत परिवर्तनशील उपक्रमांच्या मालिकेचं उद्घाटन, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते काल झालं. किसान ऋण पोर्टलचा प्रारंभ, घरोघरी किसान क्रेडिट कार्ड अभियानाची सुरुवात आणि हवामान माहिती नेटवर्क प्रणालीशी संबंधित माहिती पुस्तिकेचं प्रकाशन याचा या उपक्रमांमध्ये समावेश आहे.

****


१९ व्या आशियायी क्रीडा स्पर्धांना चीनमधल्या हांग्जू इथं प्रारंभ झाला. या स्पर्धेत काल व्हॉलीबॉल मध्ये भारताच्या पुरुष संघानं पहिल्या फेरी  कंबोडियाचा तीन - शून्य असा पराभव केला. आज भारताचा दक्षिण कोरियाशी सामना होणार आहे. या स्पर्धेचं येत्या शनिवारी औपचारिक उद्घाटन होणार आहे. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 13.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...