आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२४ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित सहकारीता क्षेत्रातल्या विविध परियोजनांची पायाभरणी तसंच लोकार्पण करण्यात आलं. सहकार क्षेत्रात ११ राज्यांच्या ११ प्राथमिक कृषी पतसमिती पैक्सच्या, जगातील सर्वात मोठ्या धान्य भंडार योजनेच्या पायलट प्रकल्पाचं उद्धाटन तसंच देशातल्या १८ हजार पैक्स संगणकीकृत परियोजनांचं उद्धाटन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं.
***
देशातल्या सर्वात मोठ्या सरंक्षण उपकरण प्रदर्शनाचं पुण्यात मोशी इथं आजपासून आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचं उद्धाटन होणार आहे.
***
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाचं अनावरण आज सकाळी रायगड इथं शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी शरद पवार गटाचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे यांच्यासह पवार गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
***
राज्य परिवहन महामंडळाकडून बीड जिल्ह्यातल्या पाटोदा ते अयोध्या अशी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. अयोध्येला जाण्यासाठी महाराष्ट्रातून ही दुसरी बस तर मराठवाड्यातून ही पहिली बस आहे. आज या एसटी बसला मार्गस्थ करण्यात आलं.
***
हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा शिवारात आज भरधाव पिकअप वाहनाने पायी जाणाऱ्या भाविकांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. हे भाविक हिंगोली तालुक्यातील सिरसम इथून माळहिवरा फाटा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी पायी जात असतांना हा अपघात झाला. जखमींना हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
***
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या रांची इथं सुरु असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी इंग्लंड संघ ३५३ धावांवर सर्वबाद झाला. काल सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिल्या डावात इंग्लंड संघानं ७ बाद तीनशे २ धावा केल्या होत्या. भारताकडून रवींद्र जडेजानं चार, आकाशदीप ३, मोहम्मद सिराज २ तर रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक- एक गडी बाद केला.
***
आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
No comments:
Post a Comment