Wednesday, 27 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:27.03.2024रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२७ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर झाली. औरंगाबाद लोकसभा मतदरासंघातून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हिंगोली मधून नागेश पाटील आष्टीकर, उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर, तर परभणीतून संजय जाधव यांना उमेदवारी घोषित झाली आहे.

त्याशिवाय दक्षिण मध्य मुंबई -अनिल देसाई, दक्षिण मुंबई - अरविंद सावंत, उत्तर पूर्व मुंबई - संजय दिना पाटील,  उत्तर पश्विम मुंबई - अमोल किर्तीकर, ठाणे - राजन विचारे, रत्नागिरी - सिंधुदुर्ग - विनायक राऊत, बुलढाणा - नरेंद्र खेडेकर, यवतमाळ-वाशिम -संजय देशमुख, मावळ - संजय वाघेरे-पाटील, सांगली - चंद्रहार पाटील, शिर्डी -भाऊसाहेब वाघचौरे, तर नाशिक इथून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

भारतीय जनता पक्षानं सहावी यादी काल जाहीर केली, यामध्ये राजस्थानच्या दोन तर मणिपूरच्या एका उमेदवाराचा समावेश अआहे.काँग्रेसनंही उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली, यामध्ये छत्तीसगढमधल्या चार तर तामिळनाडुमधल्या एका उमेदवारांचा समावेश आहे.

****

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन ‌गडकरी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

****

भाजपाच्या प्रतिनिधी मंडळानं काल सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणुक आयोगाची भेट घेतली. महाराष्ट्रासह, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल या राज्यांसह काही राज्यांमध्ये, विरोधी पक्षनेते पंतप्रधानांसह इतर नेत्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत, त्या विरोधात कडक भूमिका घेण्याची मागणी केल्याचं तावडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

****

संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी बीज यात्रेनिमित्त आज देहूमध्ये श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीनं काकड आरती, श्रींची महापूजा आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर पूजा आदी विविध कार्यक्रम होत आहेत. मंदिराला रोषणाई करण्यात आली आहे.

****

येत्या पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज आशिया- प्रशांत आर्थिक सहकार्य हवामान केंद्रानं वर्तवला आहे.

****

No comments: