Sunday, 31 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:31.03.2024रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

३१ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

छत्रपती संभाजीनगर इथून आजपासून अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होत असून हैदराबाद तसंच मुंबईसाठी एक वाढीव विमानही आज सुरू होणार आहे. नांदेड इथून बंगळुरूला तसंच दिल्ली - जालंधर ही विमानसेवाही आजपासून दररोज सुरू होत आहे तसंच, नांदेडहून हैदराबाद आणि अहमदाबादसाठी  आठवड्यातून चार दिवस विमान सेवा सुरू होत आहे.

****

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पश्चिम नागपूर मधील दाभा इथं हनुमान मंदिरापासून निघालेल्या लोकसंवाद यात्रेत सहभागी झाले आहेत. ही फेरी शहरात विविध भागातून फिरत आहे.

****

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अकोला लोकसभा मतदारसंघातून काल दोन अर्ज दाखल करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीकडून आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि अपक्ष उमेदवार मुरलीधर पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

****

परभणी लोकसभेचे निवडणूक खर्च निरीक्षक अनुराग चंद्रा यांनी काल गंगाखेड इथं या संदर्भातली आढावा बैठक घेतली. यावेळी सर्व पथकांना निवडणूक खर्चाच्या अनुषंगानं कामकाजाबाबत आवश्यक सूचना त्यांनी दिल्या.

****

राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांना केंद्र सरकारनं तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. सेवानिवृत्तीचं वयोमान पूर्ण केल्यानं ते आज निवृत्त होणार होते. मात्र ते आता ३० जूनपर्यंत या पदावर कायम असतील.

****

ईस्टर संडे निमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टर संडे निमित्त छत्रपती संभाजीनगरमधील शांतीपुरा परिसरात  मिरवणूक सुरू आहे.

****

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

****

इंडियन प्रिमीयर लीग- आयपीएल अंतर्गत आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना गुजरात टायटंन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अहमदाबाद इथं दुपारी साडेतीन वाजता तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे.

****

No comments: