Thursday, 28 March 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:28.03.2024रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२८ मार्च २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली असून चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील आठ जागी मतदान होणार आहे. यामध्ये परभणी, वाशिम या लोकसभा मतदार संघाचाही समावेश आहे. दरम्यान, आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शासकीय सुट्टी वगळता ४ एप्रिलपर्यंत सर्व दिवस उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील, यासाठी उमेदवारांना सोबत तीन वाहनं आणि इतर पाच व्यक्तींनाच परवानगी राहणार आहे.

****

देशाचा सामान्य माणूस आणि समाज मोठा झाला तरच देश मोठा होतो, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. लोकमान्य सेवा संघाच्या १०१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित "सामाजिक परिवर्तन - संस्थांची भूमिका" विषयावरील व्याख्यानात मुंबईत काल ते बोलत होते.

****

राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार, निष्ठा, स्वाभिमान सोडून जे आज प्रतिगामी शक्तींसोबत गेले आहेत, त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत नापास करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी मतदारांना केलं. मुरुड इथं काल शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

****

लातूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरंगूळ इथं माजी मंत्री आमदार अमित देशमूख यांच्या उपस्थितीत लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांची सुसंवाद बैठक सूर्यकांत पाटील यांच्या निवासस्थानी काल पार पडली.

****

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघात  सामना होणार आहे. जयपूर इथं संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...