Friday, 26 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:26.04.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२६ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं सर्वत्र उत्साहात मतदान सुरु आहे. यामध्ये राज्यातल्या नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत सरासरी सात पूर्णांक ४५ टक्के मतदान झालं. परभणी लोकसभा मतदारसंघात नऊ पूर्णांक ७२, नांदेड - सात पूर्णांक ७३, हिंगोली - सात पूर्णांक २३, वर्धा, अकोला आणि वाशिम मतदारसंघात सरासरी सात टक्के, तर अमरावती आणि बुलडाणा मतदारसंघात सरासरी साडे सहा टक्के मतदान झालं.

****

परभणी लोकसभा मतदार संघात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उन्हाचा पारा अधिक असल्याने मतदान केंद्रावर सावली, पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, सहाय्यता केंद्र, प्राथमिक उपचार अशी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

नांदेड इथं गुजराथी हायस्कूलमध्ये महिला संचलित सखी मतदान केंद्रात मतदारांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे.

****

यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, अमरावती इथं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, अकोला इथं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अभय पाटील, नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी, हिंगोली मतदारसंघात आमदार संतोष बांगर, तर बुलडाणा मतदारसंघात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मतदान केलं.

****

निवडणूक रोखे प्रकरण हा मोठा घोटाळा असून, त्याची विशेष तपास पथक - एसआयटीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन या संस्थांनी ही याचिका दाखल केली आहे.

****

एशिया व्हिडिओ इंडस्ट्री असोसिएशननं मुंबईत आयोजित केलेल्या फ्युचर ऑफ व्हिडीओ इंडिया या परिषदेचं उद्घाटन, काल मुंबईत झालं. भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला शंभर अब्ज अमेरिकी डॉलर्सची बाजारपेठ मिळवण्यासाठी चालना देण्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं उद्दिष्ट असल्याचं मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी यावेळी सांगितलं.

****

जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पाऊस झाला. कोठाकोळी गावात अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.

****

No comments: