Tuesday, 30 April 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:30.04.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

३० एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

मणिपूर मध्ये आऊटर मणिपूर मतदारसंघातल्या सहा मतदान केंद्रांवर आज फेर मतदान होत आहे. या केंद्रांवर लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला मतदान झालं होतं, मात्र निवडणूक आयोगानं याठिकाणी पुन्हा मतदान घेण्याचे निर्देश दिले होते. 

****

भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज माळशिरस, उस्मानाबाद आणि लातूर इथं प्रचारसभा होणार आहेत. लातूर इथं सारोळा रस्त्यावर ४० एकर मैदानावर ही सभा होणार असून, उन्हापासून बचावासाठी अडीच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. धाराशिव इथं तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयालगत असलेल्या २५ एकर क्षेत्रावर मोदींची सभा होणार आहे.

****

वंचित बहुजन आघाडीसाठी यंदा सकारात्मक वातावरण असून, यावेळी आम्ही आमचं लोकसभेतलं खातं नक्की उघडू, असा विश्वास, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काल पुण्यात व्यक्त केला. वंचितचे पुण्यातले उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचार शबेत ते काल बोलत होते.

****

बुलढाणा जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये पडलेला अल्प पाऊस तसंच सद्य:स्थितीत भीषण उन्हामुळे जलसाठे कोरडे होताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यातल्या धरणांमध्ये १७ पूर्णांक ८३ टक्के जलसाठा असून, येणाऱ्या दिवसांमध्ये जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातला सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा धरणातून पाणीपुरवठा योजनांसाठी जलसाठा राखीव ठेवण्यात आला आहे.

****

मालदीव इथं झालेल्या सहाव्या आशियाई कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी दुहेरीत विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या मोहम्मद गुफरान आणि श्रीनीवास यांच्या जोडीनं मालदीवच्या जोडीचा २५-१५, २५-१६ असा पराभव केला. तर महिला दुहेरीत आकांक्षा कदम आणि शायनी सेबेस्टियन यांनी भारताच्याच रश्मी कुमारी आणि नागा जोथी या जोडीचा २१-२५, २५-१७, २५-१७ असा पराभव केला.

****

दुबईत नुकत्याच झालेल्या २० वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पुण्याच्या गौरव भोसले यानं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सहा सुवर्ण पदकांसह एकूण १८ पदकं मिळवली.

****

No comments: