Thursday, 23 May 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर संक्षिप्त बातमीपत्र २३ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२३ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यमंडळ स्तरावरुन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरू करण्यात आली आहे. ९०१११८४२४२, ८४२११५०५२८ आणि ९०११३०२९९७ या क्रमांकांवर समुपदेशक २१ मे या बारावी परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून पुढील आठ दिवस सकाळी ते रात्री या वेळेत विद्यार्थ्यांना नि:शुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील.

****

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचं आज पहाटे कोल्हापूर इथं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. पी. एन. पाटील यांनी २० वर्ष कोल्हापूर काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद भूषवलं. ते प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष देखील होते. दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

बुद्ध पोर्णिमेच्या निमित्तानं हिंगोली शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा इथून आज सकाळी फेरी काढण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं.

****

नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक्क धरणात केवळ २४ टक्के पाणीसाठा शिल्लक असून पालिका सध्या शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा करत आहे. मात्र जूनच्या सुरवातीपर्यंत पावसाने हजेरी न लावल्यास आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून - जुलै महिन्यापर्यंत पाण्याचा नागरिकांनी जपून वापर करावा, असं आवाहन पालिका प्रशासन अधिकारी अमोल बागुल यांनी केलं आहे.

दरम्यान, माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेची नुतन इमारत हरित व्हावी, यासाठी नगरपरिषदेच्या छतावर १३५ किलोवॅट वीज निर्मिती करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यातून नंदुरबार नगरपरिषदेची वार्षिक ३० लाख रुपयांची बचत होणार आहे. 

****

No comments: