आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२७ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
बंगालच्या उपसागरातून पश्विम बंगाल आणि बांगलादेशच्या किना-यावर काल रात्री धडकलेल्या रेमल या चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला आहे.या वादळामुळे पश्विमबंगाल आणि बांगला देशच्या किनारपट्टीवर वेगवान वा-यासह होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुंदरबन अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर पाणी भरलं असून, तिथल्या वाघ,हरणं आणि इतर प्राण्यांना धोका उत्पन्न झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
***
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च महिन्यात घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं जाहीर होणारा हा निकाल राज्य शिक्षण मंडळाच्या सहा अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.
***
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज साठावी पुण्यतिथी आहे.या दिवसाच्या औचित्यानं काँग्रेस पक्षाच्या अनेक नेत्यांनी दिल्लीतल्या शांति वन या पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी त्यांना आदरांजली वाहिली.यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे, वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राज्यसभेचे खासदार अजय माकन यांचा समावेश होता.
****
भारताची प्रथम क्रमांकाची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं ताश्कंदमध्ये सुरु असलेल्या आशियायी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. दीपिकानं सरासरी तेरा पूर्णांक पाच सहा सहा गुण मिळवत हा विजय मिळवला आहे. भारतीय जिम्नॅस्टनं आशियायी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.
***
कल्याणी नगर अपघातातल्या अल्पवयीन आरोपीच्या रक्त नमुन्यामध्ये अदलाबदल केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातल्या दोन डॉक्टरांना अटक केली आहे. अजय तावरे आणि श्रीहरी हरलोर, अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावं आहेत.या आरोपीच्या रक्त नमुना तपासणीच्या अहवालात फेरफार करण्याचा आरोप या डॉक्टरांवर आहे.
***
विधानपरिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अभिजित पानसे यांना उमेदवारी दिली आहे. मनसे नेते आणि सरचिटणीस शिरीष सावंत यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
***
No comments:
Post a Comment