Saturday, 25 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:25.05.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२५ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

राजधानी दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तिंनी  मतदान केलं. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, केंद्रीय मंत्री डॉ.एस.जयशंकर आणि हरदीप पुरी, दिल्लीच्या मंत्री तथा आम आदमी पार्टी च्या नेत्या आतिशी यांनी दिल्लीतल्या आपापल्या मतदान केंद्रात मतदान केलं .

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज सकाळी ९ वाजेपर्यंत जवळपास सरासरी ११ टक्के मतदान झालं आहे. पश्चिम बंगाल सुमारे १७ टक्के, उत्तर प्रदेश आणि झारखंड प्रत्येकी १२, बिहारमध्ये १०, जम्मू काश्मिर आणि दिल्ली प्रत्येकी सुमारे ९ टक्के, हरियाणा ८ तर ओडिशामध्ये ९ वाजेपर्यंत ७ टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे.

***

सहाव्या टप्प्यातही नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रत्येक मत महत्वपूर्ण असून निवडणुक प्रक्रियेत सहभागी झाल्यानं लोकशाही बळकट होण्यास मदत होते असं त्यांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.  विशेषत्वानं महिला आणि युवकांनी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.

***

विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे तर मराठवाड्यात परभणीत ४३ पूर्णांक पाच, छत्रपती संभाजीनगरात ४३ पूर्णांक चार तर नांदेड इथं ४२ पूर्णांक आठ दशांश सेल्सियस तापमानाची काल नोंद झाली.

दरम्यान येत्या २ दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी वीजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

***

भारतानं दक्षिण कोरियाच्या एचिओन मध्ये धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेतल्या दुसऱ्या श्रेणीत महिलांच्या  कम्पाउंड संघ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे. ज्योती सुरेखा वेन्नाम, परणीत कौर आणि अदिति स्वामी यांनी अंतिम फेरीत  तुर्कीला हरवत ही कामफिरी केली.

ज्योति, परणीत आणि विश्व विजेती अदिति यांनी विश्वचषक स्पर्धेत एकत्र तिसऱ्या वेळी सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

***

No comments: