Thursday, 30 May 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:30.05.2024 रोजीचे दुपारी: 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 30 May 2024

Time: 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ३० मे २०२ दुपारी १.०० वा.

****

मराठवाड्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती मुळे जनावरांना दावणीपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करावे, बँकाकडून सुरू असलेली कर्जवसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजीनगर इंथ वार्ताहारांशी बोलताना केली. ते मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते. शेतकऱ्यांना मोफ वीज, बियाणे, खते उपलब्ध करून द्यावेत असेही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना राज्याचे कृषीमंत्री परदेश दौऱ्यावर जातात. या मंत्र्यांसह राज्‍य शासनाला शेतकऱ्यांचं काही देणघेणं राहिलेलं नाही. त्यांचं फक्‍त टेंडरवरच लक्ष असल्‍याची टिकाही यावेळी वडेट्टीवार यांनी केली.

****

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. इंथली माणसे त्यांच्या प्रगतीशील मूल्य आणि आदरातिथ्य यासाठी ओळखले जातात. हे सुंदर राज्य आणि तिथली जनता समृद्ध राहून विकासाच्या वाटेवर पुढे जावी, अशी इच्छा राष्ट्रपती मुर्मु यांनी व्यक्त केली.

****

चार मे पासून सुरू झालेल्या उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत १३ लाख ३६ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे. केदारनाथ इंथ दर्शनासाठी दररोज २० हजारांहुन अधिक भाविक पोहचत आहेत. राज्य शासनानं यात्रेसाठी केलेली तयारी भाविकांच्या गर्दीमुळं अपुरी पडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अनेक भाविकांना गर्दीमुळं केदारनाथाचं दर्शन घेणं शक्य होत नाही. १० मे पासून आतापर्यंत केदारनाथाचं ५ लाख ५१ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे.

****

नागरिकत्व सुधारणा कायदा-सीएए अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पश्चिम बंगाल राज्यात सुरू झाली आहे. हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातही अर्जदारांच्या पहिल्या संचाला नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे.

****

महावितरणने एकापेक्षा जास्त वीज जोडण्या असलेल्या ग्राहकांसाठी वीज जोडण्यांची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसंच वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूटही देण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त वीज जोडण्या आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या सरकारी तसंच खाजगी कंपन्यासाठी या सुविधेचा फायदा होणार आहे. किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनीला या सुविधेसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात याबाबत मार्गर्शनाची सोय करण्यात आली आहे.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात जिंतूर जवळ खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस जोधपूरहून हैदराबादकडे जात होती. चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे बसचे चाक फुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. नांदेड ते औंढा नागनाथ मार्गावरील जिंतुर टी पॉइंट जवळील टोलनाक्या जवळ आज सकाळी साडे सात च्या दरम्यान हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सोलापूर इथं काल कृषि विभागाकडून पिकावरील किडरोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं. डाळींब ही जिल्ह्याची ओळख असून रेशीम शेतीसाठी इथं पोषक वातावरण आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी डाळींब आणि रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं. यावेळी कृषी अधिकारी आणि तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.

****

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं.

नांदेडमध्ये आज सकाळी रेल्वेस्टेशन भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आव्हाड यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी अध्यक्ष प्रवीण साले, यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

****

दिल्लीतील कथीत आबकारी घोटाळ्याच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवारील यांनी नियमीत जामीन देण्याच्या मागणीसाठी स्‍थानिक राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.

दरम्यान, सर्वोच्‍च न्यायालयानं केजरीवाल यांना १० मे रोजी १ जूनपर्यंत लोकसभा निवडणूकीतील प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजुर केला होता.

****

No comments: