Thursday, 12 September 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 12.09.2024 रोजीचे दुपारी 01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 12 September 2024

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ सप्टेंबर २०२ दुपारी १.०० वा.

****

तरंग शक्ती २४ या युद्धाभ्यासासह भारत रक्षा विमानन प्रदर्शनाला राजस्थानात जोधपूर इथं आजपासून प्रारंभ झाला. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते या दोन्ही उपक्रमांचं उद्घाटन करण्यात आलं. आयोजनाबद्दल वायूसेनेचं कौतुक करत, राजनाथसिंह यांनी वायूसेनेने सदैव संपूर्ण जगभरात देशाचा मान वाढवला असल्याचं नमूद केलं. परवा १४ तारखेपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध उत्पादनं आणि उद्योगांसह संरक्षण क्षेत्रात कार्यरत उद्योगांचा सहभाग आहे. सार्वजनिक क्षेत्रांचे संरक्षण उपक्रम, विविध श्रेणीतले खाजगी उद्योग तसंच नवीन उद्योगांसह भारतीय विमान उद्योगाशी संबंधित प्रतिनिधींना भेटण्याची आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी या आयोजनातून मिळणार आहे.

****

जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर दारुगोळा, स्फोटकं, आणि हत्यारं जप्त करत, घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे. सैन्यदल तसंच जम्मू काश्मीर पोलिसांनी कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये राबवलेल्या या संयुक्त कारवाईत एके ४७ ची तसंच इतर काडतुसं, हातगोळे, आईईडी, आणि इतर साहित्याचा समावेश आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा दल कटिबद्ध असल्याचं, संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

ठाणे जिल्ह्यात कोपरी इथल्या शासकीय तांत्रिक विद्यालयात उभारलेल्या संविधान मंदिराचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि  नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय तसंच राज्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं हे मंदिर उभारण्यात आलं आहे. येत्या रविवारी १५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे उपराष्ट्रपती या संविधान मंदिराचं लोकार्पण करणार आहेत.

****

तीन दिवसीय महालक्ष्मी उत्सवाचा आज समारोप होत आहे. काल पूजन झालेल्या ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आज सायंकाळी विसर्जन होईल, यानिमित्तानं घरोघरी महिला वर्गाकडून विविध पारंपरिक सोहळ्यांचं आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत.

मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांचे राजदूत आणि परराष्ट्र व्यवहार अधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत काल श्री गणेशाची आरती झाली. या परदेशी पाहुण्यांना उकडीच्या मोदकांसह खास पारंपारिक मराठमोळी मेजवानी देण्यात आली.

****

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरातआपदा मित्रही योजना राबवण्यात येत आहे. यासाठी धुळे जिल्ह्यातून ३०० आपदा मित्र प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. आपदा मित्र प्रशिक्षणासाठी इच्छुक युवक युवतींनी संबंधित यंत्रणेच्या संकेतस्थळावर नाव नोंदणी करावी, असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केलं आहे.

****

नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयाच्या प्रस्तावास राज्य सरकारच्या उच्चस्तरीय सचिव समितीने मंजुरी दिली आहे. लवकरच या कार्यालयाचे कार्यक्षेत्र तसंच पद निर्मितीचा शासन निर्णय निर्गमित होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहर तथा अणदूर, जळकोट, नंदगाव आणि शहापूर या महसुली मंडळातील नागरिकांची अनेक दशकांपासूनची स्वतंत्र नळदुर्ग तालुका निर्मितीची मागणी आहे. स्वतंत्र तालुका निर्मितीच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.

****

४५व्या फिडे शतरंज ओलिंपियाड स्पर्धेत भारतानं मोरोक्को चा - असा पराभव केला तर महिलाच्या गटात जमैका वर साडे तीन गुणांनी विजय मिळवला. भारताच्या आर. प्रज्ञानानंद ने मोरक्कोच्या तिसिर मोहम्मद ला पराभूत केलं तर विदित गुजराती ने औआखिर मेहदी पियरे ला तसंच हरिकृष्णा ने मोयाद अनस चा पराभव केला. महिलांच्या स्पर्धेत भाताच्या  वैशालीने अदानी क्लार्क ला हरवत अव्वल स्थान पटकावलं, तानिया सचदेव ने गैब्रिएला वॉटसन चा तर दिव्‍या देशमुख ने राचेल मिलर चा पराभव केला. बुडापेस्ट इथे १२ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत हजार ८०० हून अधिक खेळाडू सहभागी आहेत, यात १९३ संघ खुल्या प्रवर्गात खेळत आहेत.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 30 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...