Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 September
2024
Time 11.00 to 11.05
AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १३ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थयी सदस्यत्व द्यायला तसंच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेनं आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतल्या अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थॉमस ग्रीन फील्ड यांनी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प्रस्ताव तयार करयाला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. भारत, जपान, आणि जर्मनी या देशांना सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावं म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे, मात्र काही देशांचा या नवीन संशोधन परिषदेला विरोध आहे.
****
कोलकाता
आर जी कार रुग्णालयाच्या घटनेच्या निषेधार्थ सुरु पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेलं आंदोलन आणि
जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी
जनतेची माफी मागत,
राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणी आंदोलकांसोबत काल प्रस्तावित
असलेली बैठक झाली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं बैठकीचं थेट प्रसारण दाखवणं शक्य
नसल्याचं सरकारनं सांगितल्यानंतर आंदोलक प्रतिनिधीनी बैठकीला न जाण्याचा निर्णय
घेतला. आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवत, कामावर रुजू व्हावं, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
****
काँग्रसचे नेते राहुल गांधी
यांनी परदेशात संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपानं तीव्र
भूमिका घेतली आहे. राज्यात भाजपा पक्ष आज याविरोधात आंदोलन करणार आहे, ‘काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ‘चा अशी हाक भाजपानं
दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात
तर आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होणार
आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची
सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या उपक्रमासाठी आतापर्यंत एक लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी
नोंदणी केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर
एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण
५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार असून, या योजनादूतांना दरमहा १० हजार
रूपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
सोलापूर विद्यापीठातल्या जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील संशोधन आणि
प्रशिक्षणासाठी, कोल्हापूरच्या सीमा बायोटेक, आणि भारत सरकारच्या
इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर, या दोन संस्थांशी
सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रकाश महानवर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या
केल्या. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन आणि प्रशिक्षण
मिळावं, या हेतूने या दोन संस्थांशी करार करण्यात आले आहेत.
****
रायगड जिल्ह्यात धाटाव
एमआयडीसीमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीमध्ये काल
झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट
इतका शक्तिशाली होता की या परिसरात जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज पोहोचला, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
****
बुलडाणा जिल्ह्यात काल वेगवेगळ्या घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातली एक महीला घरून शेताकडे निघाली असतांना विहिरीत पडून तिचा
मूत्यू झाला. अन्य एका घटनेत खामगाव तालुक्यातलाच आठ वर्षीय यश बोदडे हा मुलगा आपल्या
घराजवळ खेळताना पुलावरून नदीपात्रात पडला, वाहत्या
पाण्य्याच्या प्रवाहाने वाहत जाऊन त्याचा मूत्यू झाला. तर तीसऱ्या घटनेत
मोताळा तालुक्यातल्या जहागीरपूर इथल्या एका १४ वर्षीय मुलाचा नदीपात्रात पोहत असताना बुडून मृत्यू झाला.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या दक्षिण आशियाई
कनिष्ठ गट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या
दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने शानदार प्रदर्शन करत नऊ सुवर्ण पदकं पटकावली. भारताच्या अनिशाने थाळीफेक प्रकारात पहिलं सुवर्ण पदक जिंकलं, तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत निरु पाठकनं देखील सुवर्ण पदकाची कमाई केली.
****
ब्रुसेल्स इथं आजपासून सुरु होणार्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहे. सध्या १४व्या क्रमांकावर असलेला अविनाश आज अंतिम फेरीत पदार्पण करेल.
****
पैठण इथल्या जायकवाडी
धरणाचे आणखी दोन दरवाजे आज बंद करण्यात आले असून, विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या चार दरवाजातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment