Friday, 25 October 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर,दिनांक: 25.10.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 25 October 2024

Time: 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २५ ऑक्टोबर २०२ सकाळी.०० वाजता.

****

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. येत्या २९ तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. आजपर्यंत ५५२ उमेदवारांचे ७२० नामनिर्देशन पत्र दाखल झाली असल्याची माहिती माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.

****

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात १३ नोव्हेंबरला, ४३ मतदारसंघांत मतदान होणार असून, आतापर्यंत ७४८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

****

लातूर जिल्ह्यात लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे अमित देशमुख, लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख, तर अपक्ष उमेदवार रामराव मोरे यांनी काल अर्ज दाखल केले. अहमदपूर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारांनी, उदगीर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे यांच्यासह दोन अपक्षांनी, निलंगा इथून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, शिवसेना ठाकरे गटाचे लिंगनअप्पा रेशमे यांच्यासह दोन अपक्षांनी, तर औसा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संतोष सोमवंशी यांनी अर्ज दाखल केले.

भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दक्षिण - पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

****

नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार झिशान सद्दीकी यांनी देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आपलयासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी हा भावनिक क्षण असल्याचं सांगून सिद्दीकी यांनी, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे आभार मानले.

****

धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. धुळे शहर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार आपणच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

****

निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं सात उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून झिशान सिद्दीकी यांना, अणुशक्तीनगर मतदारसंघातून माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना, इस्लामपूर मधून निशिकांत पाटील, तासगाव - कवठे महांकाळमधून संजय पाटील, वडगाव शेरी मधून सुनिल टिंगरे, तर शिरुर मतदारसंघातून ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र निवडणूक आयोगाकडून तसंच स्थानिक प्रशासनांकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. वाशिम इथं काल जिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके यांच्या मार्गदर्शनाखाली

श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थी, विद्यार्थीनींनी आपल्या आईबाबांना पत्र लिहून मतदान करण्याचं आवाहन केलं.

****

देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ, येत्या दहा नोव्हेंबरला पूर्ण होत असून, न्यायमूर्ती खन्ना ११ नोव्हेंबरपासून सरन्यायाधिशपदाची सूत्रं स्वीकारतील.

****

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं हजार ७९८ कोटी रुपये किमतीच्या २ रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली. नरकटियागंज ते दरभंगा, सितामढी- मुझफ्फरपूर तसंच एरुपलेम-नामबुरू या दरम्यान हे रेल्वे मार्ग आहेत. येत्या पाच वर्षात अवकाश क्षेत्रासाठी १ हजार कोटी रुपयांच्या व्हेंचर कॅपिटल फंडालाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. याअंतर्गत वर्षाला सरासरी दीडशे ते अडीचशे कोटी रुपये दिले जातील.

****

दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वे सात हजार विशेष गाड्या चालवणार आहे. गेल्यावर्षीच्या साडे चार हजार गाड्यांच्या तुलनेत ही मोठी वाढ असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

****

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा मार्केटमध्ये काल ८० टन इजिप्तचा कांदा दाखल झाला. आकाराने मोठा आणि रंगाने गर्द गुलाबी असणाऱ्या या कांद्याला ४० रूपये प्रती किलोचा दर मिळत आहे. सध्या बाजारात राज्यभरातून कांदा दाखल होत असून, नाफेडकडून कांदा बाजारात आणल्याने कांद्याचे दर नियंत्रणात आहेत. स्थानिक कांद्याला २० ते २५ रूपये प्रती किलोचा दर मिळत आहे.

****

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज सकाळी रासायनिक पदार्थ घेऊन जाणारा ट्रक बंद पडला, त्याची दुरुस्ती सुरु असताना या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने स्पर्किंग दिल्याने दोन्ही ट्रकला भीषण आग लागली असून, अधून मधून स्फोट होत आहेत. त्यामुळे नागपूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी कारंजा नगरपरिषद अग्निशामक दल तसंच समृद्धी महामार्गावरील अग्निशामक दल  यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथलं जायकवाडी धरण पूर्ण भरलं असून, धरणात सध्या पाच हजार ७५१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाच्या सहा दरवाजातून पाच हजार २४० घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 13 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 13 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...