Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 September
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· इतर देशांवरचं अवलंबित्व हाच आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
· मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मधे सुरु होण्याचं रेल्वेमंत्र्यांचं
सुतोवाच
· राज्यात अतिवृष्टीग्रस्त एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही-कृषीमंत्र्यांची
ग्वाही आणि
· स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात १९ हजारावर
स्नातकांना पदवी प्रदान
****
इतर देशांवरचं अवलंबित्व हाच आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमध्ये भावनगर इथं ‘समुद्र से
समृद्धी’ या कार्यक्रमात बोलत होते. समुद्र से समृद्धी या कार्यक्रमामध्ये ३४ हजार
२०० कोटी रुपयांच्या विकास कामांचं पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. पंतप्रधानांनी ६६ हजार
कोटी रुपयांचे २१ सामंजस्य करार बंदरे आणि नौवहन मंत्रालयाकडे दूरदृश्य प्रणालीच्या
माध्यमातून सुपूर्द केले.
स्वातंत्र्याप्राप्तीच्या शतकपूर्तीपर्यंत म्हणजे २०४७पर्यंत
विकसित व्हायचे असेल तर भारताला आत्मनिर्भर होण्याशिवाय पर्याय नाही, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट - पंतप्रधान
नरेंद्र मोदी
****
महत्त्वाकांक्षी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७मधे
सुरु होईल,
असं सुतोवाच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. या
मार्गावरच्या घणसोली ते शिळफाटा बोगद्याच्या जोडकामाचा आरंभ आज सकाळी वैष्णव यांच्या
हस्ते झाला,
त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. या प्रकल्पाचा ठाणे जिल्ह्यातला
टप्पा २०२८ च्या दरम्यान पूर्ण होईल आणि त्यानंतर वांद्रे कुर्ला संकुलातल्या टप्प्याचं
काम सुरु होईल असं ते म्हणाले. या कामाची माहिती देताना वैष्णव म्हणाले –
बाईट – रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव
जपानहून या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या तज्ज्ञ पथकानं कामाच्या
प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. बुलेट रेल्वेच्या कामात
अनेक ठिकाणी स्वदेशी तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि सुटे भाग वापरले
असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
****
अमली पदार्थांसंदर्भातील गुन्ह्यांसंदर्भात राज्यानं झीरो टॉलरन्स
धोरण अवलंबल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज इंडियन
पोलीस फाऊंडेशनच्या १० व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत पोलीस मुख्यालयात झालेल्या
कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात गुंतवणूक परिसंस्थेत स्थिरता निर्माण करण्यासाठी
पोलीस प्रशासन,
डिजीटल सीमांचे संरक्षण : धोरणात्मक पोलिस - उद्योग सहकार्याची
गरज या विषयांवर चर्चा करण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनातल्या संघर्षावर आधारित
‘चलो जीते हैं’ हा
चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे. हा चित्रपट आवर्जून पाहण्याचं आवाहन
पीव्हीआर आयनॉक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता यांनी केलं आहे –
बाईट – गौतम दत्ता
****
आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ च्या
निमित्ताने खासदार रविंद्र वायकर यांच्या उपस्थितीत मुंबईत जुहू आणि वर्सोवा चौपाटीवर
स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. एक
पेड माँ के नाम या अंतर्गंत वायकरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं.
****
राज्य परिवहन महामंडळ भविष्यात नवीन येणाऱ्या आठ हजार बसेस साठी
१७ हजार ४५० चालक आणि सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून
त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष
प्रताप सरनाईक यांनी दिली. ते आज मुंबईत बोलत होते. ही ई-निविदा प्रक्रिया एसटीच्या
प्रादेशिक विभागात राबवण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण
-तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून त्यांना ३० हजार रुपये इतके किमान वेतन मिळणार
आहे.
****
अतिवृष्टीच्या नुकसानीपासून एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी
ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते आज अकोल्यात बोलत होते.
राज्यात अतिवृष्टीनं आतापर्यंत ६३ लाख ५१ हजार ५२० हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याचं
त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, भरणे यांच्या वाहनाचा ताफा आज
हिंगोली वाशिम महामार्गावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अडवत
काळे झेंडे दाखवले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या आंदोलकांनी केली.
****
शासनाने विविध योजनाद्वारे नव्या पिढीसाठी संधीची दारे उघडली
असल्याचं,
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
ते आज नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभास
बोलत होते. विद्यार्थ्यांच्या कृतीत प्रामाणिकपणा, जबाबदारी
आणि पर्यावरणाबद्दलची आस्था असावी, असं पाटील यांनी सांगितलं. कुलगुरु
डॉ. मनोहर चासकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी १९ हजार ४०० पदवी आणि पदविका
प्रदान करण्यात आल्या.
****
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे यांना भगवानराव लोमटे
स्मृती पुरस्कार आज प्रदान करण्यात आला, अंबाजोगाई इथं झालेल्या
कार्यक्रमात साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी, मुलाटे यांना हा पुरस्कार प्रदान केला.
****
सरकारी उपक्रम, धोरणात्मक सुधारणा आणि
तांत्रिक प्रगतीमुळे देशातील आरोग्यसेवा क्षेत्रात डिजिटल परिवर्तन होत आहे. वेगानं
वाढणारी लोकसंख्या आणि दर्जेदार आरोग्यसेवेची वाढती मागणी पाहता, डिजिटल आरोग्य उपाय सुलभता, परवडणारी क्षमता आणि कार्यक्षमता
वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. ऐकू या याबाबतचा विशेष वृत्तांत...
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू केलेल्या आयुष्मान भारत डिजिटल मोहिमेचं
उद्दिष्ट सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रांमधील सक्रिय सहकार्यातून एक मजबूत डिजिटल आरोग्य
परिसंस्था उभा करणं हा आहे. या मोहिमेची सुरुवात करताना पंतप्रधानांनी सांगितलं होतं
की, यामुळं देशभरातील रुग्णालयांच्या
डिजिटल आरोग्य सेवांना एकमेकांशी जोडण्यात येईल.
साथीयों, आयुष्मान भारत डिजीटल
मिशन अब, पुरे देश के अस्पतालों के डिजीटल हेल्थ सोल्युशन्स को एक दुसरे से कनेक्ट
करेगा। इसके तहत देशवासियों को डिजीटल हेल्थ आयडी मिलेगी। हर नागरिक का हेल्थ रेकॉर्ड
डिजीटली सुरक्षित रहेगा। डिजीटल हेल्थ आय डी के माध्यम से मरीज खुद भी और डॉक्टर भी
पुराने रेकॉर्ड पर जरूरत पडने पर चेक कर सकता है।
२०२१
ते २०२६ या पाच वर्षांत १,६००
कोटी रुपयांच्या नियोजित खर्चासह, या मोहिमेचे उद्दिष्ट, देशात
विकसित होत असलेल्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांसाठी आवश्यक डिजिटल आधार तयार करणे
हा आहे.
योजने
अंतर्गत ८० कोटींहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य खाती तयार करण्यात आली आहेत. आयुष्मान
भारत डिजिटल हेल्थ मोहिमेचा एक भाग असलेले
ई-संजीवनी ही एक अत्याधुनिक क्लाउड-आधारित टेलिमेडिसिन सेवा आहे. या माध्यमातून भौगोलिक
सीमा ओलांडून रुग्णांना दूरस्थ पद्धतीनं सल्लामसलत करुन आरोग्यसेवा पुरवल्या जातात.
****
परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठात प्रकल्पग्रस्त
शेतकरी नोकर भरती बाबत कृषिमंत्री स्तरावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. आमदार राजेश
विटेकर यांनी ही माहिती दिली. २३ सप्टेंबर रोजी मंत्रालयात ही बैठक होणार असल्याचं
या बातमीत म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या भोकर शहरात आज सकाळी हादरे जाणवले. स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील केंद्रात या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर
१ पूर्णांक १ शतांश इतकी नोंदवली आहे. भोकर तालुक्यात पांडुरणा गावात मागील कांही दिवसांपासून
भूगर्भातून गूढ आवाज येत आहेत.
****
२०२३ सालचा दादासाहेब फाळके
पुरस्कार ज्येष्ठ दाक्षिणात्य
अभिनेते मोहनलाल यांना
जाहीर झाला आहे. नुकतीच
ही घोषणा करण्यात आली.
****
हवामान
संपूर्ण राज्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment