Wednesday, 24 September 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.09.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 24 September 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदत करणार-नुकसानाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

·      विभागातल्या धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू-नागरिकांना सतर्कतेचा इशारा

·      ज्येष्ठ साहित्यिक पद्मभूषण एस. एल. भैरप्पा यांचं वार्धक्यानं निधन

आणि

·      आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये आज भारत - बांगलादेश सामना

****

अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी आज लातूर तसंच सोलापूर इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर औसा तालुक्यात उजनी इथं वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी टंचाईच्या वेळी केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजना राबवणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात  करमाळा, माढा, मोहोळ या भागांतील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. करमाळा इथल्या तात्पुरत्या पुनर्वसन केंद्राला भेट देऊन, तिथल्या नागरिकांशी पवार यांनी संवाद साधला.

धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातल्या सीना नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे.जिल्ह्यातल्या २९ गावांना पुरानं वेढा घातला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातील पुरबाधित करंजा गावाच्या शिंदेवस्ती आणि करळेवस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. बाधितांना लवकरच तात्पुरती मदत करण्यात येईल. तसंच पंचनामे करून, अटी आणि निकष यामध्ये शिथिलता आणून मदत करण्यात येईल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली..

****

जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेती शिवाराची आज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगतानाच तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ते म्हणाले

बाईट - कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

****

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यात गेवाराई तालुक्यातल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधुन, बाधीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत करणार असल्याचे आश्वासन दिलं. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनीही जिल्ह्यात पूरग्रस्त भागात पाहणी करून आपदग्रस्तांना धीर दिला.

लातूर जिल्ह्यातल्या तेरणा नदीपात्रातून सावरी गावात पाणी शिरले आहे.अमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सावरी गावाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली तसंच ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तसंच खुलताबाद तालुक्यात झालेल्या नुकसानाची आमदार प्रशांत बंब यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना दिलासा दिला.

****

नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरले असून शंभरहून अधिक कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जायकवाडी धरणातून ६६ हजार, मांजरा धरणातून १७ हजार, माजलगाव प्रकल्पातून सहा हजार, तर पूर्णा रेल्वे पुलाखालून सुमारे दीड लाख घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

ज्येष्ठ साहित्यिक पद्मभूषण एस. एल. भैरप्पा यांचं आज म्हैसूर इथं वार्धक्यानं निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी चोवीस कादंबऱ्या लिहिल्या. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार तसंच साहित्य अकादमी फेलोशीपसह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भैरप्पा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु: व्यक्त केलं आहे.  देशाचा आत्मा जागवणारा विचारवंत आपण गमावला असं, पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.

****

छत्तीसगडच्या दंतेवाडा इथं ७१ नक्षलवाद्यांनी आज आत्मसर्पण केलं. यापैकी ३० नक्षलवाद्यांवर एकूण ६४ लाख रुपये बक्षीस जाहीर होतं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये वरिष्ठ नक्षली कमांडर तसंच महिलांचा मोठा सहभाग आहे.

****

वैज्ञानिक तसंच औद्योगिक संशोधन क्षेत्राशी संबंधित योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. सुमारे दोन हजार २७७ कोटी रुपयांची ही योजना, संशोधन क्षेत्रात कार्यासाठी शास्त्रज्ञ तसंच विद्यार्थ्यांना एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. ते दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीतल्या निर्णयाची वार्ताहरांना माहिती देत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगाराएवढा बोनस देण्याला, तसंच जहाज बांधणी क्षेत्रासाठी सुमारे ६९ हजार कोटी रुपयांहून अधिकच्या एका विशेष पॅकेजला मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.

****

सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्व निमित्त सुरु असलेल्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात इंडिया एआय मिशनच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात करण्यात येणाऱ्या सुधारणांविषयी जाणून घेऊ.

 

कृत्रिम बुद्धिमत्ता, एआय ही एक क्रांती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या वर्षी मार्चमध्ये दहा हजार तीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह इंडिया एआय मिशनला मंजुरी दिली. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता विकास करण्याच्या बाबतीत आघाडीच्या राष्ट्रांपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, भारतासाठी एआयला काम करायला लावणेहे आमचे उद्दिष्ट आहे.

 

आज हम देख रहे हैं, भारत ए आय डेवलपमेंट और अडप्शन में आगे रहने वाले देशों मे शामील है। इसके विस्तार के लिये सरकार ने इंडिया ए आय मिशन को लाँच किया है। हम मेक ए आय इन इंडिया इसके विजन पर काम कर रहे हैं। और हमारा उद्देश है, मेक ए आय वर्क फॉर इंडिया।

 

इंडिया एआय मिशन - प्रचंड संगणक क्षमता आणि नवोन्मेष केंद्रांची निर्मिती करणं, डेटासेट विकसित करणं, स्टार्टअप्सना पाठबळ देणं आणि एआयचा सुरक्षित आणि विश्वासार्ह वापर सुनिश्चित करणे या तत्वावर आधारीत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत अधिक माहिती दिली.

 

Our Prime Minister’s vision is a democratizing technology; it should be accessible to all. That’s why we have done India AI Mission in which 34000 GPUs are today available as a common compute facility for all our innovators. The price of these GPU is just less than one dollar per hour and this is most affordable common compute facility in the entire world.

 

इंडिया एआय मोहीम केवळ एक उपक्रम नाही तर एक व्हिजन आहे. जबाबदार आणि समावेशक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत देशाला आघाडीवर ठेवणे आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचा डिजिटल पाया मजबूत करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

****

केंद्र सरकारने गेल्या ११ वर्षांत पायाभूत सुविधा क्षेत्राचा मोठा विकास केला आहे. सामान्य नागरिकांना याचा मोठा लाभ होत असल्याचं, ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी म्हटलं आहे

बाईट – उद्योजक राम भोगले

भोगले यांनी या विषयाचं केलेलं सविस्तर विवेचन, सेवापर्व निमित्त आकाशवाणीच्या विशेष प्रासंगिक या कार्यक्रमात उद्या सकाळी दहा वाजू ४५ मिनिटांनी आपण ऐकू शकता.

****

छत्रपती संभाजीनगर इथे जिल्हा रुग्णालयात नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियानाला आज प्रारंभ झाला. आज पहिल्याच दिवशी ४० हून अधिक नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली. दोन ऑक्टोबरपर्यंत ही

****

लातूर इथून पुणे आणि मुंबई साठी सोडल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस शहरातील २ क्रमांकाच्या बसस्थानकावरुन सोडण्यात येत आहेत. २६ सप्टेंबर पर्यंत हा बदल करण्यात आला आहे.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर फोर मध्ये आज भारत - बांगलादेश सामना होणार आहे. रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला होता.

****

No comments: